शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एसीच्या थंड हवेमुळे खराब होते त्वचा! डर्मेटोलॉजिस्टने सांगितलं कारण अन् सोपा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 15:18 IST

1 / 9
उन्हाळ्यात प्रचंड गरम होतं. अशा वेळी गरमीपासून आराम मिळवण्यासाठी लोक आपल्या घरांमध्ये आणि ऑफिसमध्ये एअर कंडिशनर (AC) लावतात. यामुळे थंडावा मिळतो.
2 / 9
एसीची थंड हवा काही मिनिटांत उष्णता नाहीशी करते आणि आपल्यालाही बरं वाटतं. पण तुम्हाला माहिती आहे का की, एसीची हवा तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकते. यामुळे त्वचा खराब होते.
3 / 9
जालंधर येथील डर्मेटोलॉजिस्ट डॉ. मनजोत मारवाह यांनी एका पॉडकास्टमध्ये याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.
4 / 9
डॉ. मनजोत यांनी पॉडकास्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 'खूप थंड असल्याने तुम्हाला ह्युमिडिफायरची आवश्यकता आहे.'
5 / 9
'त्वचेत दोन गोष्टी असतात. एक म्हणजे वॉटर बॅलेन्स आणि दुसरे म्हणजे ऑईल बॅलेन्स. ऑईली स्किन असलेल्या लोकांमध्ये ऑईल बॅलेन्स जास्त असतो. ड्राय स्किन असलेल्यांमध्ये कमी असतो.'
6 / 9
'वॉटर बॅलेन्स ही एक स्वतंत्र गोष्ट आहे. ज्यांची ऑईली स्किन आहे त्यांनाही ड्रायनेस जाणवू शकतो.'
7 / 9
'वॉटर बॅलेन्स कमी झाल्यानंतर स्किन थोडी खेचल्यासारखी, रफ झालेली दिसते. आपल्याला त्वचेतील बदल जाणवतो.'
8 / 9
'त्वचा खराब होऊ नये असं वाटत असेल तर जास्त वेळ एसीमध्ये बसू नका. एसीचा आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.'
9 / 9
'जर तुम्हाला एसीत बसावं लागत असेल तर तुम्ही तुमच्यासोबत मॉइश्चरायझर ठेवावं. मॉइश्चरायझर त्वचेला लावू शकता.'
टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजी