शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

How To Make Pani Puri at Home : या विकेंडला घरीच बनवा चटपटीत, चविष्ट पाणीपूरी; ही घ्या स्ट्रीट फूड स्टाईल पाणी पूरीची सोपी रेसेपी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 4:36 PM

1 / 10
पाणी पूरी, शेवपूरीचं नाव घेताच तोंडाला पाणी सुटतं. हे आपल्या सगळ्याचेच आवडते स्ट्रिट फूड्स आहेत. जेव्हाही आपण कुटुंबिय किंवा मित्र मैत्रिणींसोबत संध्याकाळच्यावेळी बाहेर फिरायला निघतो तेव्हा पाणीपूरी खायची इच्छा होते. अगदी कमी वेळात तुम्ही घरीसुद्धा भरपूर पाणी पूरी बनवू शकतात. कमी खर्चात भरपूर खाल अशी पाणी पूरी बनवण्याची सोपी रेसेपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (How To Make Pani Puri at Home)
2 / 10
मैदा- १५० ग्राम, रवा- ३ चमचे, तेल - तळण्यापूरता
3 / 10
पाणी पूरी बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये मैदा आणि रवा एकत्र करून पीठ मळून घ्या. हे कणीक थोडं घट्ट असायला हवं तरंच पूरी फुगते.
4 / 10
नंतर हे पीठ अर्धा तास बाऊलवर एक कापड झाकून ठेवून द्या. नंतर हाताला तेल लावून लहान लहान गोळे तोडून घ्या. या पीठाला जराही पाणी लावू नका.
5 / 10
हे लहान लहान गोळे व्यवस्थित एक सारख्या आकारात लाटून घ्या.
6 / 10
पुऱ्या एकसारख्या आकारात लाटून अर्धा तास तशाच ठेवा. नंतर गरम तेलात एक एक पूरी सोडून गोल्डन होईपर्यंत तळून घ्या.
7 / 10
मग रात्री भिज़वून घेतलेले पांढरे वाटाणे मीठ व हळद घालून कुकरमध्ये शिजवून त्याचा रगडा करून घ्यावा.
8 / 10
३-४ तास भिजवलेली चिंच पाण्यातून काढा. १ कप भिजवलेल्या चिंचात , १ कप गूळ, पाणी, १ चमचा लाल तिखट, १/२ चमचा जिरे पूड, १/४ चमचा चाट मसाला , १/२ चमचा सैंधव मीठ घालून मिक्सरला फिरवून चटणी करून घ्या.
9 / 10
नंतर मिक्सरच्या भांड्यात कोथिंबिर,पुदीना,आले व लसुण घेऊन त्याची पेस्ट करून त्यात ज़िरं पावडर, चाट मसाला व सैंधव मीठ आणि २ग्लास पाणी घालून चटणी पातळ घ्या
10 / 10
आता गरमागरम पुरी फोडून तुम्ही त्यात रगडा, कांदा, हिरवी चटणी, चिंचेची चटणी, आवडीनुसार शेव घालून पाणी पूरीचा आस्वाद घेऊ शकता.
टॅग्स :foodअन्नkitchen tipsकिचन टिप्सRecipeपाककृतीCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.