How many almonds should you eat in a day, what is the proper time for eating badam?
२-५ की १०? दररोज किती बदाम खाणं तब्येतीसाठी चांगलं? नेमके कधी खावे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2024 9:08 AM1 / 6बदाम खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं हे तर आपण जाणतोच. बदामातून शरीराला अनेक पौष्टिक घटक मिळतात. हृदयाच्या आरोग्यासाठी जसे बदाम चांगले असतात, तसेच ते केसांसाठी, त्वचेसाठीही वरदान ठरतात.2 / 6त्यामुळे काही जण नियमितपणे बदाम खातात. पण दररोज किती बदाम खावेत, याविषयी अनेकांच्या मनात संभ्रम असतोच. काही जणांना वाटते की दिवसाला २ बदाम खाणं योग्य तर काहींना वाटतं दिवसाला १० खाणं चांगलं.3 / 6म्हणूनच एका दिवशी एका व्यक्तीने किती बदाम खाणं चांगलं आणि बदाम खाण्याची योग्य वेळ कोणती याविषयी तज्ज्ञांकडून जाणून घेऊ. आहारतज्ज्ञ रितिका समद्दर यांनी दिलेली माहिती india.com यांनी प्रकाशित केली आहे. 4 / 6त्यानुसार आहारतज्ज्ञ असं सांगत आहेत की प्रौढ व्यक्तींनी दर दिवशी २० ते २५ बदाम खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं. तर लहान मुलांसाठी हे प्रमाण १० बदामपेक्षा जास्त नसावं.5 / 6बदाम पचविण्याची प्रत्येकाची ताकद वेगवेगळी आहे. त्यामुळे आपल्या तब्येतीनुसार आपल्या जवळच्या आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन जेवढे झेपतील, तेवढेच बदाम खावेत.6 / 6सकाळची वेळ बदाम खाण्यासाठी योग्य आहे. पण दोन जेवणांच्या मधल्या काळात, तसेच सायंकाळीही तुम्ही बदाम खाऊ शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications