शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रोज किती पाऊलं चालल्यानं वजन पटापट कमी होतं? सुडौल, फिट राहण्यासाठी तज्ज्ञ सांगतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 4:42 PM

1 / 8
वजन कमी करण्यासाठी काहीही करण्याची लोकांची तयारी असते. एकदा वजन वाढलं की महिनोंमहिने प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही. वजन घटवण्यासाठी व्यायामाबरोबर डाएटही तितकंच महत्वाचं असतं. काहीजण स्विमिंग तर काहीजण रनिंग करून वाढलेलं वजन नियंत्रणात ठेवतात. वजन कमी करण्यासाठी रोज किती वेळ चालायचं ते पाहूया.
2 / 8
रिपोर्ट्सनुसार रोज १० हजार पाऊलं चालल्यानं पोट बाहेर येत नाही. वजनही नियंत्रणात राहतं. ऑफिसमध्ये थोडा थोडा वेळ ब्रेक घेऊन वॉक केल्यानं शरीर अवघडल्याप्रमाणे वाटत नाही.
3 / 8
वॉक करताना हळूहळू वेग वाढवा आणि धावायला सुरूवात करा. घाम आल्यानं वजन कमी करण्यास मदत होईल. एक्सपर्ट्सच्या मते रोज ३० ते ४५ मिनिटं वॉक केल्यानं व्यक्ती फिट राहतो. याशिवाय आजारांपासूनही लांब राहता येतं. पण शरीरात जमा झालेली चरबी फक्त पायी चालल्यानं कमी होत नाही. त्यासाठी रोज ३० मिनिटं ब्रिस्क वॉक करायला हवं. यामुळे १५० कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.
4 / 8
रोज कमीत कमी अर्धा तास चालायला हवं. एक तासात कमीत कमी ५ ते ६ किलोमीटर चाला. एका तासात 5-6 किमी चालता येते. तसेच ठिकाणानुसार चालण्याचा वेग बदलू शकतो. उंच लोक वेगाने चालू शकतात. ज्यांना चालण्याची सवय नाही ते २-३ किमी अंतर वाढवू शकतात.
5 / 8
घाम येईपर्यंत चालायलाच हवं असं काही नाही. जर हवामान चांगले असेल तर घाम येत नाही. त्याचप्रमाणे काहींना कमी घाम येतो, तर काहींना खूपच जास्त घाम येतो. सातही दिवस चालण्यापेक्षा आठवड्यातून एक दिवस शरीराला विश्रांती देणे चांगले. यामुळे शरीराला ताजेतवाने होण्याची संधी मिळते.
6 / 8
सकाळी आणि संध्याकाळी चालणे उत्तम ठरते. यावेळी शरीरातून अधिक स्टिरॉइड संप्रेरक सोडले जातात, ज्यामुळे माणसाला चांगले वाटते. उद्यानात झाडे आणि वनस्पतींमध्ये फेरफटका मारल्याने तणाव कमी होतो. शरीराला ऑक्सिजनही जास्त मिळतो.
7 / 8
रिकाम्या पोटी चालणे चांगले त्यामुळे हलकं वाटतं. चालण्याआधी चहा प्रेमी चहा पिऊ शकतात कारण ते उत्तेजक म्हणून कार्य करते. उन्हाळ्यात फिरायला जाण्यापूर्वी अर्धा ग्लास ज्यूसही घेऊ शकता, पाणी पिऊ शकता, अन्यथा डिहायड्रेशन होऊ शकते.
8 / 8
वजन कमी करायचे असेल तर काहीही खाणे टाळा. चालण्याआधी किंवा चालताना तुम्ही थोडे पाणी पिऊ शकता. कोमट पाणी पिणे चांगले, ज्यांना खूप घाम येतो त्यांनी पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य