how should design your lunch for fast weight loss? simple tips for fast weight loss
झटपट वजन कमी करायचं? मग दुपारच्या जेवणात तुमच्या ताटात 'हे' पदार्थ असायलाच पाहिजेत By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2024 5:38 PM1 / 8वजन कमी करायचं असेल तर २ गोष्टींवर तुमचा सगळ्यात जास्त फोकस पाहिजे. त्यामधली पहिली गोष्ट म्हणजे व्यायाम आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा आहार. (how should plan your lunch for fast weight loss?)2 / 8म्हणूनच वजन कमी करण्यासाठी तुमच्या दुपारच्या जेवणात कोणते पदार्थ किती प्रमाणात असायला पाहिजे, याविषयी आहारतज्ज्ञ दिपशिखा जैन यांनी सांगितलेली आणि एनडीटीव्हीने प्रकाशित केलेली ही माहिती एकदा बघा. 3 / 8आहारतज्ज्ञ असं सांगतात की सगळे पदार्थ योग्य प्रमाणात तुम्ही खात असाल तर तुमचं वजन नियंत्रित राहण्यासाठी किंवा कमी होण्यासाठी निश्चितच मदत होऊ शकते. 4 / 8त्यामुळे सगळ्यात आधी तुमच्या दुपारच्या जेवणाची सुरुवात सलाड खाऊन करा. तुमच्या जेवणाचा साधारण पाव हिस्सा सलाड असायला हवे.5 / 8त्यानंतर तुम्ही जेवणात वाटीभर वरण किंवा पनीर आणि भाजी घेतली पाहिजे. हे प्रोटीनयुक्त पदार्थ भरपूर प्रमाणात खाणे गरजेचे आहे.6 / 8दही हे उत्तम प्रोबायोटिक मानले जाते. दह्यामध्ये असणारे घटक तुमची पचनक्रिया अधिक चांगली करते. त्यामुळे दुपारच्या जेवणात दही नियमितपणे खा.7 / 8वरील सर्व पदार्थ खाऊन झाल्यानंतर सगळ्यात शेवटचे महत्त्व पोळी किंवा भाकरीला द्या. एकाच धान्याची पोळी किंवा रोटी खाण्यापेक्षा मल्टीग्रेन रोटी खाण्यास प्राधान्य द्या.8 / 8अशा पद्धतीचं जेवण केल्यास निश्चितच वजन कमी होण्यास मदत होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications