शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्वयंपाक करायचाय पण कोथिंबीर, आलं, कढीपत्ता नाही? बघा १ सिक्रेट उपाय, स्वयंपाकाला येईल न्यारीच चव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2023 9:20 AM

1 / 7
भाजी किंवा वरण कोणतंही केलं तरी त्याला वेगळा स्वाद आणण्यासाठी आपण कोथिंबीर आलं, कढीपत्ता यांचा वापर करतो.
2 / 7
हे पदार्थ असे आहेत की ते बहुसंख्य पदार्थांमध्ये घातले जातात आणि त्यांच्यामुळे त्या पदार्थाची चव, सुगंध आणखी खुलते. पण बऱ्याचदा असं होतं की स्वयंपाक करताना ऐनवेळी लक्षात येतं की घरात कोथिंबीर, आलं किंवा कढीपत्ताच नाहीये.
3 / 7
किंवा बऱ्याचदा हे पदार्थ महाग झाल्यानेही आपण ते घेणं टाळतो. अशावेळी हे ३ पदार्थ घरात नाहीत, म्हणून अडून बसू नका. त्याऐवजी हा एक खास उपाय करा.
4 / 7
हे पदार्थ जेव्हा घरात मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात, तेव्हा त्यांच्या पावडर करून ठेवा. या पावडर एखादा महिना तरी आरामात टिकतात.जेव्हा हे पदार्थ घरात नसतात, तेव्हा त्यांच्या पावडर वापरा आणि पदार्थांना वेगळी चव द्या. आता या पदार्थांच्या पावडर कशा करायच्या ते पाहूया...
5 / 7
कोथिंबीरीची पावडर करायची असेल तर सगळ्यात आधी कोथिंबीर स्वच्छ निवडून घ्या आणि कोवळ्या उन्हात वाळवायला ठेवा. २ ते ३ दिवस चांगली वाळली की तिची पावडर करून घ्या.
6 / 7
कढीपत्त्याची पावडर करण्यासाठीही कोथिंबीरीच्या पावडरीसारखेच करावे. कढीपत्ता चांगला वाळू द्यावा. आणि त्यानंतर मिक्सरमधून बारीक करून त्याची पावडर करून घ्यावी.
7 / 7
आल्याची पावडर करायची असेल तर आले मोठ्या किसनीने किसून घ्या. त्यानंतर ते कढईत टाकून भाजून घ्या. त्याच्यातले पाणी पुर्णपणे शोषले जाईपर्यंत आलं भाजून घ्यावं. ते संपूर्णपणे कोरडं झालं की मग थंड होऊ द्यावं आणि नंतर मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर करून घ्यावी.
टॅग्स :foodअन्नCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.kitchen tipsकिचन टिप्स