शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पराठे- भाजीसाठी बटाटे उकडायला खूप वेळ लागतो? १ सोपी ट्रिक- फक्त ४ मिनिटांत उकडा बटाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2024 2:44 PM

1 / 6
बटाट्याचे पराठे, भाजी, पॅटीस असं काही करायचं असेल की सगळ्यात पहिले तयारी करावी लागते ती बटाटे उकडण्याची. बऱ्याच रेसिपींमध्ये उकडलेला बटाटा असतो. पण तेच बटाटा उकडण्याचं काम मात्र अनेक जणींना खूपच वेळखाऊ वाटतं.(cooking tips for boiling potato)
2 / 6
कारण बाकीची कामं पटापट उरकायची असतात. त्यामुळे मग बऱ्याचदा बटाटे उकडायला खूप वेळ लागत असल्याने ऐनवेळी मेन्यू बदलावा लागतो. तुमचंही असंच होत असेल तर झटपट बटाटे उकडण्याचा हा एक अगदी सोपा उपाय पाहून घ्या.(how to boil potato quickly?)
3 / 6
अगदी ३ ते ४ मिनिटांत बटाटे कसे उकडायचे, याविषयीचा एक व्हिडिओ nehadeepakshah या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. (how to boil potato in just 3 to 4 minutes)
4 / 6
यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की बटाटे स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर त्याला फोक वापरून ठिकठिकाणी बारीक छिद्र करून घ्या.
5 / 6
यानंतर ते बटाटे एका भांड्यात घाला आणि झाकण लावून २ ते ३ टेबलस्पून पाणी टाकून ३ मिनिटांसाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवून द्या.
6 / 6
पराठे, पॅटीस, भाजी यासाठी अगदी परफेक्ट बटाटे उकडले जातील.
टॅग्स :foodअन्नCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.kitchen tipsकिचन टिप्स