1 / 5ज्या घरात शाळेत जाणारी लहान मुलं असतात, ऑफिसला जाणारी मंडळी असतात त्या घरात इस्त्रीचा वापर जवळपास रोजच केला जातो.2 / 5कधी कधी घाई गडबडीत असताना एखादा कपडा जळतो आणि त्याचा डाग इस्त्रीवर पडतो. अशा इस्त्रीने मग कपडे चांगले प्रेस होत नाहीत. 3 / 5म्हणून अशी कपडा चिकटून काळपट पडलेली किंवा मग गंज चढलेली इस्त्री स्वच्छ करायची असेल तर हे दोन उपाय करून पाहा..4 / 5पहिला उपाय करण्यासाठी मीठ वापरा. यासाठी एक कागद पसरवून टाका. त्या कागदावर थोडे मीठ घाला. आणि इस्त्री सुरू करून ती एखादा मिनिट त्या मीठावरून घासा. यानंतर मेन स्विच बंद करा आणि एखाद्या मऊ कपड्याने इस्त्री पुसून घ्या. ती बऱ्यापैकी स्वच्छ झालेली असेल. 5 / 5दुसरा उपाय करण्यासाठी व्हिनेगर आणि गरम पाण यांचं एकत्रित मिश्रण करा आणि त्या मिश्रणाने इस्त्री पुसून घ्या. दोन- तीन वेळा हा उपाय केल्यास इस्त्री स्वच्छ होईल.