How To Clean Bathroom Tiles Quickly : The Right Way To Clean Your Bathroom Tiles
बाथरूमच्या टाईल्सवर काळा, मेणचण थर आलाय? ५ उपाय, वर्षानुवर्ष पांढऱ्याशुभ्र दिसतील टाईल्स By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 4:23 PM1 / 7बाथरूमच्या टाईल्स चकचकीत असाव्यात असं प्रत्येकालच वाटते. घरातील इतर भागांप्रमाणे बाथरूमच्या टाईल्स स्वच्छ करणं गरजेचं आहे. दर तुम्हाला रोज बाथरूम स्वच्छ करायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही सुट्टीच्या दिवशी करू शकता. यासाठी तुम्हाला फार खर्च करावा लागणार नाही. घरगुती उपायांनी तुम्ही बाथरूम स्वच्छ करू शकता. 2 / 7तुम्ही बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचे मिश्रण महिन्यातून एकदा साफ करण्यासाठी वापरू शकता. हे टाइल्समधील ग्रॉउट देखील साफ करते. टाइल्सच्या जॉइंटला ग्रॉउट म्हणतात, ज्याची सुरक्षा खूप महत्वाची आहे. यासाठी विशेषत: ग्राउट सीलेंटचा वापर केला जातो, ते भिंतीतील पाण्याची गळती, ओलसरपणा आणि बुरशीपासून संरक्षण करते. वर्षातून दोनदा सीलंट लावावे. ग्राउट तुटल्यास ताबडतोब दुरुस्त करा. 3 / 7टाईल्स चांगल्या राहण्यासाठी बाथरूमध्ये आर्द्रता कमी करावी लागेल. अंघोळीनंतर बाथरूमचे दरवाजे आणि खिडक्या काही वेळासाठी उघडे करून ठेवा. शक्य असल्यास एक्जोस्ट फॅन लावा. 4 / 7बाथरूमच्या टाइल्स अनेकदा खराब होतात कारण लोक लोखंडी किंवा धातूच्या बादल्या आणि मग वापरतात, त्या खूप जड असतात, ज्यामुळे टाइल्स एकतर तुटतात किंवा त्यांचा वरचा थर निघतो. त्यामुळे प्लास्टिकची बादली, मग किंवा टब वापरा, कारण ते खूप हलके असतात.5 / 7टाईल्स अशा प्रकारे बसवाव्यात की पाणी एका ठिकाणी साचणार नाही आणि ते थेट नाल्यात पडेल. त्यामुळे टाईल्स लवकर खराब होत नाहीत आणि चांगल्या टिकतात.6 / 7लिंबू आणि व्हिनेगरचा वापर करून टाईल्स स्वच्छ करणं खूपच सोपं आहे. फक्त हे मिश्रण लावून ठेवा त्यानंतर पाण्याने टाईल्स स्वच्छ धुवा. 7 / 7बाथरूममध्ये तुम्हाला आवडेल त्या फ्लेवरचे बाथरूम फ्रेशनर ठेवा जेणेकरून दुर्गंध येणार नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications