शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पावसाळ्यात फ्लोअर मॅटचा कुबट वास त्रासदायक, न धुता फ्लोअर मॅट स्वच्छ करण्याचे ६ उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2024 11:54 AM

1 / 7
आपल्या सगळ्यांच्याच घराबाहेर एक छोटीशी चौकोनी आकाराची फ्लोअर मॅट असतेच. या फ्लोअर मॅटलाच आपण पाय पुसून घरात प्रवेश करतो. यामुळेच या फ्लोअर मॅटवर धूळ, माती, घाण चिकटून बसते. असे हे फ्लोअर मॅट रोज वापरले जाते. या फ्लोअर मॅटची वेळोवेळी योग्य ती स्वच्छता देखील केली पाहिजे. असे न केल्यास हा फ्लोअर मॅट अधिक घाण होऊन त्यातून कुबट वास किंवा दुर्गंधी येऊ लागते. पावसाळ्यात तर हा फ्लोअर मॅट पाणी व चिखल यामुळे अधिकच खराब होतो. पावसाळ्यात वारंवार हा फ्लोअर मॅट धुवायचा म्हटलं तर तो व्यवस्थित सुकत नाही. यामुळे खराब झालेला हा फ्लोअर मॅट न धुता देखील आपण स्वच्छ करु शकतो. न धुताच फ्लोअर मॅट स्वच्छ कसा करावा ते पाहूयात( How to Clean Door Mats Without a Washing).
2 / 7
फ्लोअर मॅट स्वच्छ करण्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा वापर करु शकता. जर आपल्याला फ्लोअर मॅट न धुता अगदी इन्स्टंट पद्धतीने स्वच्छ करायची असेल तर बेकिंग सोडा हा एक उत्तम पर्याय आहे. घराबाहेरील अंगणात फ्लोअर मॅट पसरवून ठेवावी. त्यानंतर या फ्लोअर मॅटवर भरपूर प्रमाणात बेकिंग सोडा घालावा. त्यानंतर किमान ३० ते ४५ मिनिटे तो बेकिंग सोडा फ्लोअर मॅटवर असाच ठेवून द्यावा. जर फ्लोअर मॅट अधिक खराब झाले असेल त्यावर चिखलाचे डाग किंवा घाण दुर्गंधी येत असेल तर आपण बेकिंग सोडा घालून रात्रभरासाठी ते तसेच ठेवू शकता. त्यानंतर व्हॅक्यूम क्लिनरच्या मदतीने हो फ्लोअर मॅट स्वच्छ करुन घ्यावी.
3 / 7
व्हाईट व्हिनेगर हे एक उत्तम नैसर्गिक दुर्गंधीनाशक आहे. एका स्प्रे बाटलीमध्ये व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात घेऊन मिसळा. त्यानंतर फ्लोअर मॅटवर हे द्रावण संपूर्णपणे फवारून घ्या. आता ३० मिनिटांसाठी ही मॅट तशीच ठेवून द्यावी. त्यानंतर फ्लोअर मॅट उन्हात स्वच्छ वाळवून घ्यावे. फ्लोअर मॅट संपूर्णपणे सुकल्यानंतर त्यातून येणारा कुबट वास दुर्गंधी निघून जाईल.
4 / 7
फ्लोअर मॅटमधून येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी आपण इसेंशियल ऑइलचा देखील वापर करु शकता. एका स्प्रेच्या बाटलीत २ टेबलस्पून इसेंशियल ऑइल घेऊन त्यात अर्धा ग्लास पाणी ओतावे. इसेंशियल ऑइल आणि पाण्याचे हे द्रावण फ्लोअर मॅटवर सगळीकडे व्यवस्थित शिंपडून घ्यावे. आता ही मॅट सावली असणाऱ्या भागात ठेवून वाळवून घ्यावी. मॅट व्यवस्थित सुकल्यानंतर त्यातून घाण दुर्गंधी निघून जाऊन इसेंशियल ऑइलचा मंद असा हलका सुवास येऊ लागेल.
5 / 7
अ‍ॅक्टिव्हेटेड चारकोल हा उत्तम प्रतीचा स्मेल अ‍ॅब्जॉर्बर आहे. अ‍ॅक्टिव्हेटेड चारकोलचे लहान लहान तुकडे करून ते एका कॉटनच्या छोट्या पाउचमध्ये ठेवावे. असे किमान ४ ते ५ पाउच बनवून घ्यावेत. हे पाउच रात्रभर फ्लोअर मॅटच्या आसपास ठेवून द्यावेत. अ‍ॅक्टिव्हेटेड चारकोल फ्लोअर मॅटमधील दुर्गंधी सहजतेने शोषून घेते.
6 / 7
कपडे धुण्याच्या वॉशिंग मशीनमध्ये असणाऱ्या ड्रायर शीटचा वापर करून देखील आपण फ्लोअर मॅट मधील दुर्गंधी घालवू शकतो. फ्लोअर मॅटच्या वर आणि खाली एक अशा दोन ड्रायर शीट ठेवून द्याव्यात. अशाप्रकारे ही मॅट दोन दिवस उन्हात वाळवून घ्यावी. यामुळे ड्रायर शीट मॅटमधील दुर्गंधी शोषून घेईल. त्यामुळे फ्लोअर मॅट मधील दुर्गंधी नाहीशी होण्यास मदत होईल.
7 / 7
जर तुम्हाला फ्लोअर मॅट धुवायचे नसेल, तर तुम्ही ही मॅट कडक उन्हात आणि खुल्या हवेत संपूर्णपणे सुकेपर्यंत ठेवू शकता. कडक उन्हामुळे या फ्लोअर मॅट मधील जंतू मारले जातील. तसेच हवेत वाळवल्याने त्यातील कुबट वास व दुर्गंधी नाहीशी होईल. कडक उन्हात तुम्ही फ्लोअर मॅट वाळवू शकता. कडक ऊन आणि मोकळी हवा फ्लोअर मॅट मधील दुर्गंध दूर करण्यात व बॅक्टेरिया मारण्यास मदत करेल.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलCleaning tipsस्वच्छता टिप्स