how to clean floor to make it shine, simple tricks and tips to clean tiles
फरशी पुसण्याच्या पाण्यात ४ पदार्थ टाका, मुंग्या- झुरळं गायब होतील, फरशा लख्ख चमकतील.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2024 1:46 PM1 / 7फरशी पुसणं हे अगदी रोजचं काम. पण तरीही अगदी दररोज नेमाने फरशी पुसूनही तिच्यावर डाग राहतातच. किंवा फरशी म्हणावी तशी फ्रेश, स्वच्छ, चकाचक दिसत नाही.2 / 7खासकरून घरात लहान मुलं असतील तर फरशीवर खूप डाग पडतात आणि फरशा स्वच्छ करणं कठीण होऊन जातं. म्हणूनच आता फरशी पुसण्याचा हा एक खास उपाय पाहा.3 / 7यामध्ये आपण घरातलेच काही पदार्थ फरशी पुसण्याच्या पाण्यात टाकणार आहोत. त्यामुळे फरशांवरची चमक नक्कीच वाढेल. शिवाय फरशा आणि त्यामुळे घरही छान सुगंधित होईल.4 / 7हा उपाय करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे घरात वारंवार होणाऱ्या मुंग्या, झुरळं यांचं प्रमाणही खूप कमी होईल. त्यासाठी अगदी घरातल्या कानाकोपऱ्यातून स्वच्छ फरशी पुसा. हा उपाय home2tips and diy2insta या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 5 / 7हा उपाय करण्यासाठी फरशी पुसण्याच्या पाण्यात १ लहान वाटी व्हिनेगर आणि तेवढंच फ्लोअर डिसइन्फेक्टंट घाला. 6 / 7त्यानंतर त्या पाण्यात १ चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा टीस्पून कोणतंही डिशवॉश लिक्विड घाला.7 / 7सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि मग त्या पाण्याने फरशी पुसा. यामुळे फरशा अगदी नव्यासारख्या लख्ख चमकतील. आणखी वाचा Subscribe to Notifications