शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खिडकीला बसवलेली जाळी घाण साचून काळपट झाली? १ मस्त ट्रिक- काही मिनिटांतच जाळी चकाचक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2024 1:52 PM

1 / 7
डास घरात येऊ नयेत म्हणून आपण खिडक्यांना जाळी बसवतो. त्यालाच मॉस्किटो नेट असंही म्हणतात. सुरुवातीला ही जाळी छान चकाचक असते. पण काही महिन्यांतच बाहेरची धूळ तिच्यामध्ये अडकत जाते आणि ती जाळी अगदीच कळकट होते. (how to clean mosquito net or mosquito grills of window?)
2 / 7
ही जाळी कशी स्वच्छ करायची ते बऱ्याचदा लक्षात येत नाही. म्हणूनच या पाहा काही साध्या- सोप्या टिप्स. काही मिनिटांतच तुमची जाळी अगदी नव्यासारखी चकाचक होऊन जाईल. (simple and easy trick to clean mosquito net)
3 / 7
खिडक्यांची जाळी स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात आधी जाळीवर बसलेली धूर एखाद्या सुती कपड्याने पुसून घ्या.
4 / 7
त्यानंतर एका वाटीमध्ये १ चमचा लिक्विड डिटर्जंट घ्या. त्यामध्ये ३ ते ४ चमचे पाणी टाका. ते सगळं व्यवस्थित हलवून मिक्सर करा आणि खिडक्यांच्या जाळीवर शिंपडा. तुमच्या खिडकीच्या जाळीच्या मापानुसार या मिश्रणात कमी- जास्त करा.
5 / 7
यानंतर कपडे घासण्याचा जो ब्रश असतो तो ब्रश घेऊन खिडकीवर घासून ४ ते ५ मिनिटे चांगली सफाई करा.
6 / 7
ब्रशच्या ऐवजी तुम्ही बाजारात मिळणारा असा ब्रशही वापरू शकता. हा ब्रश खास खिडक्यांना बसविलेल्या माॅस्किटो नेट स्वच्छ करण्यासाठीच आहे. ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही तुम्ही तो घेऊ शकता.
7 / 7
जाळीची चांगली घसाई झाली की त्यावर पाणी टाका आणि पुन्हा एकदा ब्रश फिरवून घासून घ्या. यामुळे राहिलेली घाणही निघून जाईल आणि कळकट, काळपट पडलेल्या खिडक्या स्वच्छ, चमकदार दिसतील.
टॅग्स :Cleaning tipsस्वच्छता टिप्सHome remedyहोम रेमेडी