how to clean stains on kitchen towel, how to wash microfibre napkins in kitchen
स्वयंपाकघरातले नॅपकिन चिकट, कडक होतात- कळकट नॅपकिन स्वच्छ करण्याचा १ सोपा उपाय By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2024 9:18 AM1 / 7स्वयंपाक घरातले हात पुसण्याचे नॅपकिन वारंवार खरकटे हात लागल्याने चिकट, तेलकट होतात. त्यांचा रंगही अगदीच कळकट दिसू लागतो.2 / 7हे नॅपकिन आपण धुवायला टाकतो, पण हळूहळू त्यांच्यातला तेलकटपणा, खरकटेपणा स्वच्छ झाला नाही तर ते नॅपकिन कडक होऊ लागतात. शिवाय त्यांच्यातला कळकटपणा निघतही नाही.3 / 7तुमच्या घरातले असे खराब झालेले नॅपकिन पुन्हा नव्यासारखे चकाचक करण्यासाठी हा एक घरगुती उपाय करून पाहा. हा उपाय housewife_to_homemaker या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.4 / 7हा उपाय करण्यासाठी आपल्याला व्हिनेगर लागणार आहे.5 / 7सगळ्यात आधी एका पातेल्यात कडक पाणी करून घ्या. त्या पातेल्यात २ ते ३ टेबलस्पून व्हिनेगर आणि १ टेबलस्पून लिक्विड डिटर्जंट टाका आणि त्यामध्ये जवळपास अर्ध्या तासासाठी नॅपकिन भिजत ठेवा.6 / 7यानंतर ते नॅपकिन कपडे घासण्याच्या ब्रशने घासून स्वच्छ करा. 7 / 7पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यातून धुवून घ्या आणि घट्ट पिळून वाळायला टाका. नॅपकिनवरचे सगळे कळकट डाग निघून जातील. आणखी वाचा Subscribe to Notifications