How to cut jaggery easily, tricks and tips for cutting jaggery
गुळाची भेली फोडणं कठीण जातं- सगळीकडे चिकट होतं? बघा झटपट गूळ फोडण्याची सोपी युक्ती By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2024 6:13 PM1 / 5गुळाची पावडर बाजारात मिळत असली तरी अजूनही अनेक घरांमध्ये गुळाची भेलीच आणली जाते. कारण गुळाच्या पावडरची चव अनेकांना आवडत नाही. शिवाय गुळाच्या भेलीपेक्षा गुळाची पावडर तुलनेले अधिक महाग असते. 2 / 5पण गुळाची भेली आपण आणतो तर खरं. पण ती फोडताना मात्र अनेकींना खूप वैताग येतो. कारण तो गूळ खूप कडक असल्याने सुरीने नीट कापताही येत नाही. शिवाय त्याच्यावर काही आपटून आपटून ती फोडायची म्हटलं तरी ती अगदी चिकटलोळ होऊन जाते. 3 / 5हे सगळं टाळण्यासाठी गुळाची भेली अगदी सोप्या पद्धतीने एकदम झटपट कशी फोडावी, याबद्दलचा व्हिडिओ seemassmartkitchen या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 4 / 5या व्हिडिओमध्ये असं दाखवलं आहे की एका डिशमध्ये बटरपेपर टाका आणि त्यावर गुळाची भेली ठेवा.5 / 5यानंतर तो गूळ ४० ते ५० सेकंदासाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवून द्या. नंतर तुम्ही जेव्हा तो गूळ बाहेर काढाल तेव्हा तो एकदम मऊ झालेला असेल. हा गूळ मऊ असताना पटापट कापून घ्या आणि डब्यात भरून ठेवा. आणखी वाचा Subscribe to Notifications