शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिवाळीसाठी 'अशी' सुंदर सजवा तुमच्या घरातली बाल्कनी, छोट्याशा जागेत आकर्षक सजावट करण्यासाठी ७ टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2024 3:18 PM

1 / 7
दिवाळीत आपण घर तर छान सजवतोच (Diwali Celebration 2024). पण त्यासोबतच आपल्या घरासमोरची छोटीशी बाल्कणी किंवा टेरेस कसं सजवायचं असा प्रश्न काही जणींना पडतोच (balcony makeover ideas for Diwali). बाल्कनी छोटीशीच आहे, तिथे काय सजावट करता येईल, असा प्रश्न पडला असेल तर या बघा काही खास आयडिया..(how to decorate balcony or terrace for Diwali?)
2 / 7
हल्ली अशा प्रकारची लाइटिंग बाजारात मिळते. किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही तुम्ही ती खरेदी करू शकता. नेहमीच्या त्याच त्या लाइटिंगपेक्षा ही फुलापानांची रोषणाई तुमचं टेरेस उजळवून टाकेल.
3 / 7
अशा प्रकारच्या माळा देखील बाजारात मिळतात. किंवा तुमच्या घरी झेंडूच्या फुलांच्या आर्टिफिशियल माळा असतील तर त्या माळांच्या खालच्या टोकाला एखादी तार बांधून त्यावर बॅटरीवर चालणारे दिवे ठेवू शकता.
4 / 7
तुमच्या बाल्कनीचा छोटासा कॉर्नर अशा पद्धतीने वेगवेगळे शोपीस ठेवून दिव्यांनी सजवून टाकू शकता.
5 / 7
लाइटिंगचा झगमगाट नको असेल तर अशा साध्या पणत्या बाल्कनीत ठिकठिकाणी ठेवा. बाल्कनीमध्ये अतिशय मंगलमय, शांत वाटेल.
6 / 7
दिवाळीच्या काळात वेगवेगळ्या आकाराचे कंदिल बाजारात मिळतातच. त्यांचा वापर करून अशा पद्धतीने छान सजावट करता येईल.
7 / 7
दिवाळीच्या काळात वेगवेगळ्या आकाराचे कंदिल बाजारात मिळतातच. त्यांचा वापर करून अशा पद्धतीने छान सजावट करता येईल.
टॅग्स :Home Decorationगृह सजावटTerrace Gardenगच्चीतली बागDiwaliदिवाळी 2024