How to do healthy fast in Shravan? 5 important diet tips for fast in shravan
श्रावणात उपवास करताय पण ५ गोष्टी लक्षात ठेवा, उपवास होतील सोपे- आणि वाढेल फिटनेस By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2023 1:36 PM1 / 7उत्साही, आनंदी तसेच व्रतवैकल्यांचा महिना म्हणून श्रावण ओळखला जातो. या महिन्यामध्ये अनेक जणी एकभुक्त करतात. म्हणजेच एकवेळ जेवण आणि उर्वरित वेळेत उपवास. 2 / 7श्रावणातले उपवास हेल्दी असावेत, डाएटफुल असावेत आणि तब्येतीसाठी पुरक ठरावेत, यासाठी काय करावं, उपवासात कोणते पदार्थ खावे आणि कोणते टाळावे, याविषयीची महत्त्वाची माहिती आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी एका व्हिडिओद्वारे शेअर केली आहे. 3 / 7यामध्ये मंजिरी यांनी सांगितलेली सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे आपल्याला उपवास आहे, हे आपल्या शरीराला कळायला हवं. एरवी उपवास म्हणजे एकदशी आणि दुप्पट खाशी असं काहीसं होतं. पण श्रावणात मात्र वातावरणातल्या बदलामुळे पचनशक्ती मंदावलेली असते. त्यामुळे एकवेळ जेवून पोटाला, पचनसंस्थेला आराम देणं या दिवसांत तब्येतीच्या दृष्टीने चांगलं आहे.4 / 7श्रावणातल्या उपवासात अनेक जण फळं खाण्यावर भर देतात. पण आधी सांगितल्याप्रमाणे या दिवसांमध्ये पचनशक्ती आणि चयापचय क्रिया मंदावलेली असते. त्यामुळे कच्ची फळं किंवा कच्चं सलाड जास्त खाऊ नये. जे काही खाणार आहात ते ताजं आणि गरम असावं.5 / 7उपवासातला तुमचा आहार हा लो कॅलरी आणि पचायला हलका असावा. 6 / 7श्रावणात आहारात साजूक तुपाचा वापर वाढवावा. 7 / 7उपवास करताना पोट अगदी तुडूंब भरू देऊ नका. पोटात थोडी भूक शिल्लक ठेवा. तरच या दिवसांत उपवास केल्याचे फायदे होतील. आणखी वाचा Subscribe to Notifications