1 / 7दांडिया खेळायला जायचंय, पण पार्लरमध्ये जाऊन फेशियल- क्लिनअप करायला वेळच मिळेना.... असं असेल तर स्वयंपाक घरातला हा एक पदार्थ लगेच बाहेर काढा...2 / 7थकवा आल्यावर तो घालविण्यासाठी आणि पुन्हा फ्रेश होण्यासाठी कॉफी पिता ना... मग असाच आता त्वचेचा थकवा घालविण्यासाठी आणि त्वचेची हरवलेली चमक पुन्हा मिळविण्यासाठी कॉफी वापरून पाहा....3 / 7कॉफीमध्ये असणारे काही घटक त्वचेसाठी अतिशय पोषक ठरतात. त्यामुळे जेव्हा फेशियल करायला वेळ नसेल तेव्हा कॉफी खूप उपयुक्त ठरते.4 / 7चमकदार त्वचा मिळविण्यासाठी कॉफीचा कसा वापर करायचा, ते आता पाहूया... यापैकी जो उपाय तुम्हाला सोपा वाटेल तो उपाय तुम्ही करू शकता. 5 / 7सगळ्यात पहिला उपाय म्हणजे एका वाटीमध्ये कॉफी पावडर आणि मध सम प्रमाणात घेऊन व्यवस्थित कालवून घ्या. चेहरा थोडा ओलसर करा आणि हा लेप चेहऱ्यावर हलक्या हाताने चोळून लावा. यानंतर १० मिनिटाने चेहरा धुवून टाका.6 / 7दुसरा उपाय करण्यासाठी १ टीस्पून कॉफी घ्या, त्यात अर्धा टीस्पून पिठीसाखर टाका. हे मिश्रण चेहऱ्यावर हलक्या हाताने चोळा. चेहऱ्याचं खूप चांगल्याप्रकारे स्क्रबिंग होईल.7 / 7तिसरा उपाय करण्यासाठी १ टीस्पून कॉफी, १ टीस्पून हळद एका वाटीत घ्या. त्यात लिंबू पिळून हे मिश्रण कालवून घ्या. हा लेप चेहऱ्याला लावा. ५ मिनिटे गोलाकार पद्धतीने हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर २ ते ३ मिनिटे हे मिश्रण तसेच चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर चेहरा धुवून टाका.