शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

थोडं काम केलं तरी थकवा येतो? मॅग्नेशियमचा खजिना आहेत ५ पदार्थ, रोज खा-स्टॅमिना वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 8:17 PM

1 / 8
शरीरात पोषक घटकांची कमतरता भासली तर कोणतेही अवयव दुखू शकतात. ताकद वाढवण्यासाठी किंवा स्टॅमिना वाढवण्यासाठी आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. मॅग्नेशियम मिळवण्यासाठी तुम्हाला महागडे अन्नपदार्थ खाण्याची काही गरज नाही तुम्ही घरच्याघरी उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करून मॅग्नेशियमची कमतरता भरून काढू शकता. (Megnesium Foods That are Super Healthy)
2 / 8
डार्क चॉकलेट मॅग्नेशियमचा उत्तम स्त्रोत आहे. ज्यामुले हृद्याचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
3 / 8
एवाकॅडो सॅण्डविच किंवा भाजीमध्ये तुम्ही वापरू शकता. यात भरभरून मॅग्नेशियम असते.
4 / 8
काजू, बदाम, ब्राजिल नट्स मॅग्नेशियमचा उत्तम स्त्रोत आहेत. रात्री भिजवलेले काजू, बदाम, पिस्ता, सकाळी खाल्ल्याने शरीराला एनर्जी मिळते.
5 / 8
चवळीच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर कॅल्शियम असते. या भाज्यांचा रोजच्या आहारात समावेश केल्यास तब्येत चांगली राहते.
6 / 8
प्रोटीन आणि मॅग्नेशियमसाठी टोफू हे टॉप फूड आहे. टोफूमध्ये भरपूर पोषक घटक असतात.
7 / 8
आळशीच्या बीया, कलिंगडाच्या बीया, भोपळ्याच्या बीया यात मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते. ज्यामुळे हृदयाचे आरोग्यही चांगले राहते.
8 / 8
गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी यात कॅल्शियम, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. रोजच्या आहारात या धान्यांचा भाकरींचा समावेश करा.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यFitness Tipsफिटनेस टिप्स