शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

घरात पालींच्या छोट्या पिल्लांचा सुळसुळाट ? ५ सोपे उपाय-पाली गायब होतील

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 8:39 AM

1 / 7
प्रत्येकाच्याच घरात पाली आणि त्यांची छोटी पिल्लं दिसून येतात खासकरून भिंतीवर पाली जास्त पाहायला मिळतात. पालींपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता. (How to Get Rid From Lizards in Home)
2 / 7
कांदा लसणाचा तीव्र वास त्याच्या सालींमध्येही असतो. या वासाने पाली दूर पळतात. इतकंच नाही तर पालींची सुटका होते.
3 / 7
नॅप्थलीन बॉल्समुळे पालींसह इतर किटक दूर होण्यासही मदत होते. घराच्या कोपऱ्यांर किंवा दरवाज्यांजवळ तुम्ही हे बॉल्स ठेवू शकता.
4 / 7
मोराची पीस घरात ठेवल्याने पाली दूर होतात. मोराच्या पीसाचे अनेक फायदे आहेत. मोराच्या पीसाने घरही प्रसन्न राहते.
5 / 7
पुदिन्याच्या तीव्र वासाने पाली घराच्या बाहेर पडण्यास मदत होईल. पुदिन्याच्या पानांचा तीव्र वास पालींना जराही आवडत नाही. ज्यामुळे पाली दूर होण्यास मदत होतात.
6 / 7
घरात पाली शिरू नयेत यासाठी शक्यतो खिडक्या बंद ठेवा. किंवा जाळीच्या खिडक्या बसवून घ्या.
7 / 7
घरात जास्तीत जास्त स्वच्छता ठेवा. अन्नाचे कण पडलेले नसतील याची काळजी घ्या.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलHomeसुंदर गृहनियोजन