शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

संध्याकाळी डासांनी घर भरतं-रात्री झोपूही देत नाही? किचनमधल्या ५ गोष्टी वापरा, डास होतील गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 2:05 PM

1 / 6
रात्रीच्यावेळी भरपूर डास चावतात. त्यामुळे झोप मोड होते अशी अनेकांची तक्रार असते. डासांना पळवण्यासाठी किचनमध्ये असलेल्या काही पदार्थांचा तुम्ही वापर करू शकता. (Home remedies for mosquito repellent) मॉस्किटो रिपेन्लट स्प्रे हार्ड केमिकल्सपासून तयार केले असतात ज्यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. डासांना पळवून लावण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता.
2 / 6
कॉफीमुळे फक्त झोपच उडत नाही तर डास सुद्धा दूर पळतात. पाण्यात कॉफी पावडर घालून याचा स्प्रे तयार करा आणि घरात ज्या ठिकाणी जास्त डास येतात त्या ठिकाणी कॉफी पावडरचा स्प्रे करा. या उपायाने डास दूर पळण्यास मदत होईल.
3 / 6
लसणाचा तीव्र वास डासांना जराही आवडत नाही. डासांना पळवण्यासाठी लसूण सोलून बारीक पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट एका बॉटलमध्ये भरून त्यात पाणी मिसळून डास येतात अशा ठिकाणी स्प्रे करा ज्यामुळे डास आजूबाजूलाही फिरकणार नाहीत.
4 / 6
पुदिन्याचा वास किटकांना जराही आवडत नाही. पुदीन्याची पानं बारीक करून त्याची पेस्ट एका बॉटलमध्ये भरून त्यात पाणी घाला आणि या पाण्याचा स्प्रे करा.
5 / 6
व्हिनेगर डासांना दूर पळवण्याचा प्रभावी उपाय आहे. एका स्प्रे बॉटलमध्ये व्हिनेगर भरून ते पाण्यात मिसळून घरात शिंपडा, अंगावरही शिंपडू शकता. याच्या वासाने डास घरात शिरणार नाहीत.
6 / 6
लिंबू आणि लवंग डासांना दूर पळवण्यासाठी एक घरगुती उपाय आहे. डासांना दूर पळवण्यासााठी लिंबूचे स्लाईस कापून त्यात ४ ते ५ लवंग घालून घराच्या कोपऱ्यांवर ठेवा. यामुळे डास घरापासून दूर राहतील
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलHealth Tipsहेल्थ टिप्स