शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

किचनमध्ये बघावं तिकडे झुरळं फिरताना दिसतात? ४ सोपे बदल, घरात एक झुरळ दिसणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2024 12:38 PM

1 / 6
पावसाळा असो किंवा अन्य कोणताही ऋतू असो.. बऱ्याचदा आपल्या घरात आणि विशेषत: स्वयंपाकघरात बघावं तिकडे झुरळं फिरताना दिसतात.
2 / 6
घरात लहान मुलं असल्याने बाजारात झुरळांसाठी मिळणारे केमिकलयुक्त स्प्रे मारायलाही नको वाटतं. त्यामुळेच घरातला झुरळांचा उच्छाद कमी करायचा असेल तर स्वत:ला ४ सवयी लावून घ्या. यामुळे तुमच्या घरात कधीच झुरळं दिसणार नाहीत.
3 / 6
पहिली सवय म्हणजे रात्री झोपण्यापुर्वी स्वयंपाकाचा ओटा, डायनिंग टेबल किंवा अन्नपदार्थ ठेवण्याची जागा आणि सिंक स्वच्छ करून घ्या. त्यावर कुठेही खरकटं, ओलसर पदार्थ नसावेत. खरकट्या पदार्थांच्या वासाने लगेच झुरळं येतात.
4 / 6
सिंकमध्ये कधीही खरकटे भांडे ठेवू नका. घरातल्या झुरळांचं प्रमाण वाढण्याचं ते एक मोठं कारण आहे.
5 / 6
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर यांचं मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये तयार करून ठेवा. दररोज रात्री हे मिश्रण सिंकमध्ये तसेच ओट्यावर शिंपडून सिंक आणि ओटा स्वच्छ करा. हे उपाय housewife_to_homemaker या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहेत.
6 / 6
व्हिनेगर, पाणी, डिशवॉश लिक्विड आणि इसेंशियल ऑईल टाकून एक मिश्रण तयार करा. आठवड्यातून दोन वेळा हे मिश्रण गॅसवर, ओट्यावर शिंपडून स्वच्छता करा. यामुळेही झुरळांचे तसेच इतर किटकांचे प्रमाण कमी होते.
टॅग्स :Cleaning tipsस्वच्छता टिप्सkitchen tipsकिचन टिप्सSocial Viralसोशल व्हायरल