How To Get Rid Pimples : Pimples Remove pimples From Face Health Tips Face Cleaning Tips
उष्णतेमुळे चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? ५ पदार्थ खाणं सोडा, पुळ्या-डाग दिसणार नाहीत By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 6:54 PM1 / 7ऊन्हाळ्याच्या दिवसांत स्किनशी संबंधित समस्या सतत जाणवतात. धूळ, माती, घाम आल्यामुळे चेहऱ्यावरचे पोर्स बंद होतात. याव्यतिरिक्त शरीरात हॉर्मोनल बदल्ससुद्धा दिसतात ज्यामुळे पिंपल्स येतात2 / 7पिंपल्सचा धोका टाळण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात तरीही चेहऱ्यावर ग्लो येत नाही. खाण्यापिण्यात चुकीच्या पदार्थांचा समावेश केल्यास पिंपल्स येणं सुरू रराहतं. पिंपल्सपासून बचावासाठी काही पदार्थांचे सेवन टाळायला हवे. 3 / 7चिप्स, फ्रेंच फ्राईज, बर्गर, पिज्जा हे फास्ट फूड तेल आणि साखरयुक्त असतात ज्यामुळे पिंपल्स जास्त प्रमाणात येतात.4 / 7चॉकलेट्समध्ये फॅट आणि शुगरचे प्रमाण जास्त असते. जे स्किनसाठी अजिबात चांगले नाही. पिंपल्सपासून बचावासाठी चॉकलेट जास्त खाऊ नका.5 / 7डेअरी प्रोडक्ट्सचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येतात. डेअरी प्रोडक्ट्समध्ये लॅक्टोज आणि फॅट जास्त प्रमाणात असतात. ज्यामुळे त्वचेचे नुकसान होते.6 / 7तळलेले, भाजलेले आणि जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नका. अन्यथा चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होत नाहीत.7 / 7कॅफेनयुक्त पदार्थांचे कमीतकमी प्रमाणात सेवन करा. असे पदार्थ जास्त घेतल्यास पिंपल्स कमी होत नाहीत. आणखी वाचा Subscribe to Notifications