शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

परिक्षा सुरू होण्यापूर्वीच मुलांच्या लिखाणाचा वेग वाढवा; 5 ट्रिक्स, पटापट पेपर सोडवतील मुलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 8:07 PM

1 / 8
परिक्षेला जाण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात दडपण असते. पाठ केलेलं सगळं आठवेल का, पेपरात आपण पाठ केलेलेच प्रश्न येतील ना, पेपर वेळेत लिहून होईल ना असे वेगवेगळे प्रश्न विद्यार्थीच्या मनात असतात. (How To Increase Your Kid's Writing Speed Before Exams)
2 / 8
कारण पेपर कितीही सोपा किंवा अवघड असेल तरी वेळेत सोडवणं फार महत्वाचे असते. पेपर वेळेत पूर्ण होण्यासाठी डोक्याबरोबरच हातसुद्धा वेगानं चालायला हवेत. मुलांच्या लिखाणाचा वेग वाढवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स पाहूया.
3 / 8
लिखाणाचा वेग वाढवण्यासाठी रेग्युलर प्रॅक्टिसची ठेवा. रोज 1 ते 2 पानं कमीत कमी वेळात लिहिण्याचा प्रयत्न करा.
4 / 8
मोठी वाक्य लिहिण्यात बराच वेळ जातो म्हणून छोटी छोटी वाक्यरचना, कठीण शब्दांऐवजी सोप्या शब्दांचा वापर करा.
5 / 8
पेन जास्त जोरात पकडू नका. यामुळे तुमची बोटं दुखू शकतात आणि वेगही कमी होईल.
6 / 8
प्रश्न लक्षपूर्वक वाचा त्यानंतर उत्तर लिहा. पॉईंटर स्वरूपात उत्तर लिहा ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल.
7 / 8
टाईम लिमिट सेट करून उत्तर लिहा. ठराविक प्रश्नाला किती वेळ द्यायचा हे आधीच ठरवून घ्या. ज्यामुळे वेळ वाया जाणार नाही आणि सर्व प्रश्नांना समान वेळ मिळेल.
8 / 8
सुंदर हस्ताक्षराकडे लक्ष द्या. एका दिवसात हे होणार नाही पण हळूहळू तुमचं अक्षर सुधारेल. लिहिताना लक्ष एकाच ठिकाणी केंद्रीत करा. मन शांत ठेवा, यामुळे वेग वाढवण्यास मदत होईल.
टॅग्स :Parenting Tipsपालकत्वkidsलहान मुलं