शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बाग नेहमीच हिरवीगार राहण्यासाठी 'हा' पदार्थ नियमितपणे झाडांना द्या- इतर कोणत्याही खताची गरजच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2023 12:19 PM

1 / 7
झाडांची वाढ चांगली होत नाही, झाडांना फुलं येत नाहीत, माती भुसभुशीत राहीली नाही किंवा सारखी पानं गळून जात आहेत... अशी झाडांच्या वाढीसंदर्भात कोणतीही तक्रार असेल तर आता या सगळ्या समस्यांवरचा एक छोटासा उपाय पाहूया...
2 / 7
हा उपाय नियमितपणे केल्यास तुमच्या बागेला कधीच कोणतं वेगळं खत देण्याची किंवा औषध फवारण्याची गरज पडणार नाही.
3 / 7
पिझ्झा, ब्रेड हे पदार्थ करताना आपण ते पदार्थ छान फुलावेत यासाठी यीस्ट वापरतो. आता तेच यीस्ट तुमची बाग छान फुलावी म्हणून वापरून पाहा. बागेसाठी यीस्टचा वापर कसा करायचा हे gardening.tipss या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलं आहे.
4 / 7
एक कप पाणी घ्या आणि त्यात १ टीस्पून यीस्ट घाला. तासाभराने हे मिश्रण झाडांवर फवारा. झाडांची पानं छान हिरवीगार होतील.
5 / 7
एक कप पाण्यात १ टीस्पून यीस्ट आणि १ टीस्पून बेकिंग सोडा घाला. हे मिश्रण मातीमध्ये टाका. यामुळे मुळांची वाढ चांगली होऊन झाडांची वाढही भराभर होते. महिन्यातून एकदा हा उपाय करा.
6 / 7
एक कप पाण्यात १ टीस्पून यीस्ट आणि बटाट्याच्या बारीक चिरलेल्या अर्धी वाटी फोडी घाला. हे मिश्रण झाडांना घातल्याने झाडाला भरपूर फुलं येतील.
7 / 7
१ कप पाणी, १ टीस्पून यीस्ट आणि १ टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर असं एकत्र करून झाडांना दिल्यास माती कायम भुसभुशीत राहते. मातीला कडकपणा येत नाही.
टॅग्स :Gardening Tipsबागकाम टिप्सPlantsइनडोअर प्लाण्ट्सWaterपाणीHome remedyहोम रेमेडी