शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

How to Look Smart In Office : ऑफीससाठी परफेक्ट फॉर्मल लूक हवा तर लक्षात ठेवा ७ गोष्टी, दिसाल एकदम स्मार्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2022 2:45 PM

1 / 8
ऑफीसला आपण जितके छान दिसलो पाहिजे तितकेच स्मार्टही दिसलो पाहिजे. त्यामुळे ऑफीसचा फॉर्मल लूक कसा असावा याबाबत आपल्याला काही गोष्टी माहित हव्यात. ऑफीसचे कपडे, मेकअप, हेअरस्टाइल ऑफीस लूकला साजेशी असेल तर नकळत आपला समोरच्यावर प्रभाव पडतो. पाहूयात याविषयीच्या काही महत्त्वाच्या टिप्स...
2 / 8
ऑफीसच्या कपड्यांचे रंग निवडताना ते साधारण फॉर्मल असतील असे पाहावे. हे रंग ट्रीपला जाण्याच्या कपड्यांसारखे किंवा एरवी घालण्याच्या कपड्यांसारखे गडद असतील तर आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाऊ शकते. साधारणपणे पांढरा, काळा, ग्रे, निळा, चॉकलेटी किंवा पेस्टल रंगाचे कपडे ऑफीसमध्ये जास्त चांगले वाटतात.
3 / 8
भारतीय महिला ऑफीस वेअर म्हणून साडी किंवा कुर्तेही घालतात. त्यांची निवड करतानाही ते सोबर रंगाचे आणि कॉटन किंवा खादी कापडाचे असतील तर तुमचा समोरच्यावर जास्त चांगला प्रभाव पडू शकतो. ऑफीसमध्ये आपण वावरत असताना आपण कसे कपडे घालतो यावरुन आपली ओळख ठरत असते. त्यामुळे आपण स्वच्छ, टापटीप आणि सोबर कपडे घातले तर आपली वेगळी छाप पडू शकते.
4 / 8
याबरोबरच आपण ऑफीसला जाताना जे दागिने घालतो ते जास्त भडक किंवा खूप मोठे असतील तर चांगले वाटत नाही. अशावेळी साधे पण तितकेच उठून दिसणारे दागिने आपण फॉर्मल कपड्यांवर घालायला हवेत. यामध्ये मोती, खडा किंवा स्टोन यांचा आपण आवर्जून वापर करु शकतो. हे दागिने जास्त हेवी नसतील याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. कानात टॉप्स, एखादे सिंपल पण लक्ष जाईल असे नेकलेस, फॉर्मल लूक देणारे घड्याळ, हातात एखादे ब्रेसलेट या गोष्टी आपल्या फॉर्मल लूकमध्ये नक्कीच भर घालतात.
5 / 8
ऑफीसला जाताना डोळ्यांचा मेकअप हा खूप गॉडी न करता तो जास्तीत जास्त उठावदार पण तरीही सिंपल राहील याकडे लक्ष द्यायला हवे. यासाठी आयलायनर, मस्कारा यांचा आवर्जून वापर करावा. आयशॅडो लावणार असाल तर जास्त गडद रंग न वापरता पिंक, आबोली, स्कीन कलर असे फॉर्मल वाटणारे रंग वापरावेत. लायनर लावतानाही खूप जाड किंवा डोळ्याच्या बाहेर येणारे, वेगळ्या रंगाचे लायनर शक्यतो वापरु नये. काजळ पसरत असल्याने चांगल्या प्रतीचे असेल तरच काजळ लावावे.
6 / 8
चेहऱ्याचा मेकअप करताना फाऊंडेशन न लावता बीबी क्रीमचा वापर करावा. तसेच चेहऱ्याला न चुकता प्रायमर लावून मगच मेकअपला सुरुवात करावी. म्हणजे हा मेकअप दिर्घकाळ टिकण्यास मदत होते. चेहऱ्यावर जास्त प्रमाणात डाग असतील तर कंसिलरचा वापर करणे हा चांगला पर्याय ठरु शकतो. जास्त उत्पादने एकावर एक लावण्यापेक्षा सिंपल मेकअप ऑफीससाठी कधीही जास्त चांगला वाटतो. लिपस्टीकची शेडही फार गडद न घेता न्यूड किंवा पिंक किंवा फिकट असलेली जास्त चांगली.
7 / 8
हेअरस्टाईल हा ऑफीसला जाताना एक महत्त्वाचा भाग असतो. यामध्ये आपले केस मध्यम किंवा लहान असतील तर मोकळे सोडणे हा चांगला पर्याय आहे. अन्यथा केसांचा डोक्यावर आंबाडा बांधणे, एक छानशी वेणी घालणे हेही पर्याय फॉर्मल लूकसाठी चांगले आहेत. पण काम करताना केसांची अडचण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. त्यामुळे स्मार्ट दिसण्याबरोबरच तुमचा कम्फर्टही तितकाच गरजेचा आहे याचे भान ठेवायला हवे.
8 / 8
एकूण काय तर फॉर्मल लूक हा तुमच्या ऑफीसच्या ठिकाणी तुमची एकप्रकारे इमेज तयार करणारा असतो. त्यामुळे तुम्ही कसे राहता, कसे वावरता, कसे बोलता यावर तुमच्याबद्दलची इमेज ठरणार असते. सध्याच्या जगात स्वत:ला कॅरी करणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असून ऑफीसला जाताना तुम्ही टापटीप आणि अप टू डेट असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने योग्य ती काळजी घ्यायला हवी.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सMakeup Tipsमेकअप टिप्स