शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पोट कमीच होत नाहीये? शरीरातलं एक्स्ट्रा फॅट्स घटवण्याच्या ५ टिप्स- सुडौल, कॉन्फिडंट दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 2:45 PM

1 / 7
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेले बरेच लोक फॅट्स घटवताना मांसपेशीसुद्धा गमावतात. यामुळे वजन वेगानं कमी होतं. पण शरीरात साचलेली अतिरिक्त चरबी अजिबात घटत नाही. काही वेट लॉस सिक्रेट्स तुम्हाला वजन कमी करण्यास फायदेशीर ठरू शकतात.
2 / 7
फॅट्स कमी करण्याच्या सिक्रेट्सबाबत डायटीशियन मानसी यांनी इंस्टाग्रामपेजवरून अधिक माहिती दिली आहे. वजन कमी करताना काही बेसिक रुल्स फॉलो करून तुम्ही वजनात कमालीची घट मिळवू शकता.
3 / 7
१) वजन कमी करण्यासाठी आणि फॅट्स कमी करण्यासाठी वेट लिफ्टींग करायला हवं, यामुळे मसल्स विकसित होतात. वजन उचलल्यानं मेटाबॉलिझ्मचा वेग वाढतो. वजन उचलताना जीम इंस्ट्रक्टरचा सल्ला घ्या. अन्यथा दुखापत होण्याची शक्यता असते.
4 / 7
२) पोटाची चरबी कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी व्यायाम करायला हवा. यावेळी शरीर फास्टिंगच्या स्थितीत असते. हे फॅट बर्निंगसाठी उत्तम आहे. वेगानं चालण्याचाही प्रयत्न करावा.
5 / 7
३) रात्री लवकर जेवा. जर तुम्ही रात्रीचं जेवण जास्त जड घेतलं तर इतक्या कॅलरीज शरीर खर्च करू शकणार नाही आणि ते फॅट्सच्या स्वरूपात शरीरावर जमा होतील.
6 / 7
४) चांगली झोप घेतल्यानंही शरीरावर जमा झालेलं एक्स्ट्रा फॅट कमी करता येतं. कारण झोपेसाठीसुद्धा कॅलरीची आवश्यकता असते. म्हणूनच झोपण्याच्या २ तास आधी काही खाऊ नका. झोप शरीराला रिपेअर करण्याचे काम करून कार्यक्षमता सुधारते.
7 / 7
५) दिवसभरात पुरेसे पाणी आणि ग्रीन टी प्या. हे बीटा ऑक्सिडेशनद्वारे चरबी जाळण्यास गती देईल. बीटा ऑक्सिडेशन चयापचय वाढवून चरबी जाळण्यास मदत करते.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यFitness Tipsफिटनेस टिप्स