How to Loss Weight Faster : How to naturally lose weight fast tips to help you lose weight
वजन घटेल झरझर, पाहा नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंतचा सोपा डाएट प्लॅन, स्लिमच नाही तर फिटही व्हा By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 4:30 PM1 / 7वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे डाएट प्लॅन्स घेतात. वजन कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट डाएट प्लॅन कोणता आहे असा प्रश्न आहारतज्ज्ञांना नेहमीच विचारला जातो. जर तुम्हाला काही आठवड्यातच वजन कमी करायचं असेल तर कमी वेळेत वजन कमी करणारा डाएट प्लॅन तुम्ही ट्राय करू शकता.2 / 7मेयो क्लिनिकनुसार हे वजन कमी करण्याासाठी प्रसिद्ध असलेले एक डाएट आहे. किटो डाएट प्रमाणेच हे डाएट असते. यातून शरीराला कार्बोहायड्रेट्स आणि उर्जा मिळते. या प्रकारच्या डाएटमध्ये कॉम्पलेक्स कार्ब्स, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्सचे संतुलन असते. 3 / 7यात फायबर्स आणि प्रोटीन्ससारखी तत्व असतात. यात फळं, भाज्या, शेंगा यांचा समावेश आहे. यात फायबर्स, फळं- भाज्यांचा समावेश करावा. हे डाएट करत असताना तुम्हाला एक्सरसाईजकडेही लक्ष द्यावे लागते. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म वाढून वेगानं वजन कमी होईल.4 / 7नाश्त्याला तुम्ही पालक, पनीरपासून तयार झालेले पदार्थ आणि चहा किंवा कॉफी घेऊ शकता.5 / 7दुपारच्या जेवणात व्हेजिटेबल सॅलेड असावं, भाज्या याशिवाय स्पार्कलिंग वॉटर असावे. रात्रीच्या जेवणात ग्रिल्ड भाज्या आणि सॅलेड्चा समावेश असावा. मधल्या वेळेत भूक लागल्यानंतर तळलेले पदार्थ खाण्याऐवजी भाजलेले पदार्थ खा.6 / 7आठवड्यातून कमीत कमी २ ते ३ वेळा व्यायाम करा, जेणेकरून निरोगी राहाल.7 / 7जास्त तेलकट पदार्थांचे अतिसेवन करू नका. भाजलेले पदार्थ खा आणखी वाचा Subscribe to Notifications