How to Lossen Tight Blouse : 5 Useful Tight Blouse Hacks How to get Right Fitting Blouse
ब्लाऊज घट्ट होतंय? या ५ पद्धतीने ब्लाऊजला द्या नवा लूक; जुनं ब्लाऊजही परफेक्ट फिटिंगचं दिसेल By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 4:07 PM1 / 7शरीराचा आकार हा नेहमी कमी जास्त होत राहतो. अशावेळी घट्ट कपडे वापरताना प्रोब्लेम येतो. आपल्या फिटिंगनुसार ब्लाऊज शिवून घेतल्यानंतर काही महिन्यांनी तेच ब्लाऊज घट्ट होऊ लागतं. अनेकदा टेलर ब्लाऊज फिटिंग करताना एक्स्ट्रा कापड सोडत नाहीत. ज्यामुळे ब्लाऊज आपल्या फिटिंगप्रमाणे कठीण होतं. ऐनवेळी ब्लाऊज कसं सैल करायचं असा प्रश्न पडतो. ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित बसण्यासाठी तुम्ही सोप्या ट्रिक्स वापरू शकता. (How to Lossen Tight Blouse)2 / 7१) घट्ट ब्लाऊजला योग्य फिटिंगमध्ये आणण्यासाठी ही प्रभावी टेक्निक आहे. सगळ्यात आधी बॅक ब्लाऊज कट करून दोन भागात वेगळे करा. नंतर ब्लाऊजच्या कलरच्या कॉन्ट्रास्ट कलरच्या कापडाने छोटे बो डिडाईन पूर्ण पाठीवर शिवून घ्या. तुम्ही हवंतर साडीच्या मॅचिंग रंगाचे बॅक बोज डिजाईन्स बनवून फिक्स करू शकता. 3 / 7२) स्टायलिश लूक हवा असेल तर ब्लाऊज दोन्ही बाजूंनी दाबूनमध्ये एक डिजाईन बनवा. जर ब्लाऊज बोट नेक असेल तर याची फिटिंग खूपच सोपी आहे. 4 / 7३) पाठीसाठी ब्लाऊजच्या रंगाचं कापड घेऊन दोन्ही बाजूंनी शिवून घ्या. तुम्ही पूर्ण गळा झाकलेलाही ठेवू शकतात किंवा डिजाईनचे पॅच लावू शकता. 5 / 7४) ब्लाऊज डिप नेक असेल तर तुम्ही कॉन्स्ट्रास्ट कलरची एक्स्ट्रा नॉड लावू शकता. 6 / 7५) हातांमध्ये ब्लाऊज घट्ट होत असेल तर उसवून पुन्हा नवीन कापड लावून फॅन्सी ब्लाऊजच्या बाह्या शिवून घ्या. ब्लाऊजला मागच्या बाजूला चेन लावलेलीसुद्धा छान दिसेल.7 / 7ब्लाऊज लूज करण्यासाठी बाजूला एक्स्ट्रा कापड लावा. मागच्या बाजूला तुम्ही फॅन्सी बटन्ससुद्धा लावू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications