शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पारंपरिक पद्धतीचं आंबट-गोड कैरीचं लोणचं! ५ टिप्स- वर्षभर टिकेल, बुरशीही लागणार नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2025 10:50 IST

1 / 7
उन्हाळ्यात आपण वाळवणाचे पदार्थ हमखास बनवतो. पापड, कुरडईसारखे अनेक पदार्थ आपण बनवतो. पण या काळात हमखास बनवलं जाते ते लोणचं.(how to make mango pickle at Home)
2 / 7
जेवणाच ताट हे लोणच्याशिवाय अपूर्णच असते. गरग गरम वरण-भात वरुन साजूक तूपाची फोडणी आणि चवीला आंब्याच्या लोणच्याची फोड. या काळात फक्त कैरीचे नाही तर विविध भाज्यांचे आणि लिंबाचे लोणचे देखील बनवले जाते. ( spicy mango pickle)
3 / 7
वर्षभर टिकावे म्हणून आपण लोणचे बनवतो परंतु, अगदी काही महिन्यातच त्याला बुरशी लागते. यंदाच्या उन्हाळ्यात लोणचे बनवणार असाल आणि ते लवकर खराब होऊ नये असे वाटत असेल तर या सोप्या टिप्स लक्षात ठेवा.
4 / 7
लोणचे बनवताना कैरी ही कच्ची असायला हवी. ती पिवळी किंवा थोडी पिकलेली असेल तर लोणच्याची चव बदलते व लोणचे लवकर खराब होते.
5 / 7
कैरीला धुवून उन्हाळात दोन ते तीन दिवस वाळवून घ्या. कैरी ओली असल्यास लोणचे खराब होते. ज्या भांड्यात लोणचे बनवणार असाल ती व्यवस्थित स्वच्छ करुन घ्या. काचेची बरणी असेल तर कोमट पाणी घालून १० मिनिटे ठेवा. त्यानंतर बरणी कोरडी होऊ द्या.
6 / 7
कैरीचे लोणचे जास्त काळ टिकवायचे असेल तर त्यात मोहरीचे तेल वापरा. तेलाचे प्रमाणही योग्य असायला हवे. लोणचे मुरण्यासाठी प्लास्टिकच्या भांड्यांचा वापर करु नका. यासाठी बरणी किंवा चिनी मातीची भांडी वापरा.
7 / 7
लोणच्याला बुरशी लागू नये म्हणून आठवड्यातून एकदा तरी त्याकडे लक्ष द्या, चमच्याने ढवळा. चमचा वापरताना तो ओला नसवा याची काळजी घ्या. अन्यथा बुरशी लागेल.
टॅग्स :foodअन्नRecipeपाककृती