शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रिमझिम पावसात प्या गरमागरम व्हेजिटेबल सूप, शेफ कुणाल कपूर देतात ५ टिप्स, प्या पोटभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2022 2:35 PM

1 / 8
१. रिमझिम पावसात एखादं मस्त चवीचं गरमागरम सूप प्यायला मिळालं तर क्या बात है... पावसाचा आनंद घेत घेत आपल्या आवडीचं सूप पिण्याचा आनंद काही वेगळाच असतो. शिवाय सूप असतंही अगदी हेल्दी. त्यामुळे अशा छान वातावरणात जर व्हेजिटेबल सूप करण्याचा विचार करत असाल तर या काही गोष्टी लक्षात ठेवा..
2 / 8
२. सूप करण्यासाठी तशी खूप काही मेहनत घ्यावी लागत नाही. पण चव उत्तम जमण्यासाठी थोड्या ट्रिक्स आणि टिप्स वापराव्या लागतात, एवढं मात्र नक्की. तरच त्या सूपचा आनंद तुम्हाला मिळू शकतो.
3 / 8
३. म्हणूनच तर अशा या मस्त पावसाळी वातावरणात व्हेजिटेबल सूप करण्याचा विचार करत असाल तर सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी सांगितलेल्या या काही खास टिप्स लक्षात ठेवा.. यामुळे सुपची पौष्टिकता अधिक वाढेल, शिवाय सूप चवीलाही उत्तम होईल.
4 / 8
४. व्हेजिटेबल सूप करण्यासाठी अमूकच भाज्या वापरा असं काही नाही. या सूपच्या चवीचा आनंद तुम्ही तेव्हाच घेऊ शकता, जेव्हा त्यातल्या भाज्या तुमच्या आवडीच्या असतील. त्यामुळे व्हेजिटेबल सूप करण्यासाठी ज्या भाज्या तुम्हाला आवडतात, त्याच भाज्या निवडा.
5 / 8
५. फक्त भाज्या निवडताना त्या सिझनल असतील, याची मात्र काळजी घ्या. कारण आपल्याला तेच अन्न पचतं, जे सिझनल असतं.
6 / 8
६. सूप करण्यासाठी जेव्हा भाज्या शिजवाल, तेव्हा त्या खूप कच्च्याही नको आणि खूप जास्त शिजवलेल्याही नको. त्यांच्यातला कच्चेपणा निघून जाईल, एवढ्याच फक्त त्या शिजवा. सूप पिताना त्यातील भाज्यांचा क्रंच जाणवायला हवा. त्यामुळे त्यांच्यातला पौष्टिकपणाही टिकून राहतो.
7 / 8
७. कुणाल कपूर यांच्या या खास टिप्स व्यतिरिक्त आणखी काही गोष्टीही व्हेजिटेबल सूप करताना लक्षात ठेवाव्या.. उदा. सूप झाल्यानंतर सगळ्यात शेवटी गॅस बंद केल्यानंतर त्यात थोडेसे लिंबू पिळा. यामुळे सूपची पौष्टिकता आणि चव दोन्हीही वाढेल.
8 / 8
८. सूप झाल्यानंतर त्यात थोडेसे योगर्ट किंवा बटर टाका. सूपची चव तर बदलेलच पण त्याच्यावर एक वेगळीच चमक दिसू लागेल.
टॅग्स :foodअन्नRecipeपाककृतीCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.kitchen tipsकिचन टिप्सKunal Kapoorकुणाल कपूर