how to peel off roasted peanut skin quickly, best home hacks to peel off roasted peanut
एका मिनिटांत किलोभर शेंगदाण्यांची टरफलं निघतील- बघा उपाय, काम होईल एकदम सोपं By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2024 11:59 AM1 / 6नवरात्रीनिमित्त बहुतांश घरांमध्ये उपवास करण्याची परंपरा आहे. नऊ दिवस सलग उपवास असतात. त्यामुळे मग उपवासाचे वेगवेगळे पदार्थ करावे लागतात. उपवासाच्या पदार्थांमध्ये एक पदार्थ हमखास लागतोच आणि तो म्हणजे शेंगदाणे किंवा भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट. (how to peel off roasted peanut skin quickly?)2 / 6आता शेंगदाणे भाजणं किंवा त्याचा कूट करणं हे सोपं काम आहे. पण भाजलेल्या शेंगदाण्यांची टरफलं काढणं हे मात्र खूप अवघड काम आहे. ते काम अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं, ते पाहा.. (best home hacks to peel off roasted peanut)3 / 6शेंगदाण्यांची टरफलं चांगली आणि पटकन निघावी यासाठी सगळ्यात आधी ती चांगली खरपूस भाजली गेली पाहिजेत. जर शेंगदाणे चांगले भाजले गेले तरच त्यांची टरफलं चटकन मोकळी होतात.4 / 6दुसरी गोष्ट म्हणजे शेंगदाणे भाजण्यासाठी गॅस नेहमी मध्यम आचेवर ठेवावा. खूप मोठा गॅस करून घाईघाईने शेंगदाणे भाजू नका. यामुळे ते जळतात.5 / 6शेंगदाणे भाजून झाल्यानंतर ते बऱ्यापैकी कोमट होऊ द्या. त्यानंतर ते एका पिशवीमध्ये घाला. पिशवीमध्ये थोडं मीठ टाका आणि तिचे तोंड बांधून घ्या. त्यानंतर पिशवी जमिनीवर किंवा ओट्यावर ठेवा आणि हाताने जोर देऊन रगडा.6 / 6मीठाचे आणि शेंगदाण्याचे घर्षण होते आणि त्यांची टरफलं चटकन मोकळी होण्यास मदत होते. एखादा मिनिट हे केलं तरी पुरेसं आहे. त्यानंतर शेंगदाणे एखाद्या परातीमध्ये काढा आणि फटकून घ्या. टरफलं निघून जातील. आणखी वाचा Subscribe to Notifications