शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डोळ्यांना चष्मा नको? नियमित ७ पदार्थ खा, चष्म्याचा नंबरही होईल कमी-नजर तीक्ष्ण होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 4:27 PM

1 / 8
डोळे शरीरातील नाजुक अवयवांपैकी एक आहे. (How to Remove Spectacles Permanently) तासनतास फोन पाहणं, धूळ-प्रदूषण यांमुळे डोळ्याच्या आरोग्याचे नुकसान होत आणि कमी वयात चष्मा लागतो. आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चशमा लागतो. रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश केला तर दृष्टी सुधारेल आणि चष्म्याचा नंबरही कमी होईल. (Food For Eye Health)
2 / 8
पालक, केल, कोलार्ड ग्रीन्स या भाज्यांमध्ये ल्यूटिन आणि जेक्ससैंथिन, एंटी ऑक्सिडेंट्स जास्त प्रमाणात असतात. ज्यामुळे डोळ्यांच्या समस्या टाळता येतात.
3 / 8
गाजरात बिटा कॅरोटीन असते. गाजर व्हिटामीन ए चा चांगला स्त्रोत आहे. गाजराच्या सेवनाने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
4 / 8
संत्री, लिंबू आणि द्राक्षांमध्ये व्हिटामीन सी चे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे मोतीबिंदूचा धोका कमी होतो आणि डोळ्यांशी संबंधित समस्या टाळ्यास मदत होते.
5 / 8
ब्लू बेरी, स्ट्रोबरे, रासबेरी, एंटी ऑक्सिडेंट्स, व्हिटामीन सी ने परिपूर्ण असतात. ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
6 / 8
बदाम, अक्रोड, चिया सिड्स आणि अळशीच्या बिया व्हिटामीन, ओमेगा-३ फॅटी एसिड्स असतात. ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
7 / 8
राजमा, डाळी, बीन्स यात मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात. राजमा, डाळीचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
8 / 8
लाल शिमला मिरचीमध्ये व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असते. ब्लड वेसल्स चांगल्या राहण्यासाठी आणि डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी याचे सेवन फायदेशीर ठरते.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सeye care tipsडोळ्यांची निगा