शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Diwali Vibes: जुन्या भरजरी साड्या वापरून सजवा घर! घराला छान 'फेस्टिव्ह लूक' देण्यासाठी ६ टिप्स..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2024 6:32 PM

1 / 8
दिवाळीमध्ये आपण स्वत:साठी, घरातल्या प्रत्येकासाठी वेगवेगळे नवे भरजरी कपडे घेतो आणि आपला नेहमीच लूक बदलतो. आता सणासुदीला आपल्या सोबतच आपल्या घराचा लूकही पुर्णपणे बदलून टाकण्याचा ट्रेण्ड आला आहे.
2 / 8
हल्ली घरांना सुद्धा फेस्टीव्ह लूक दिला जातो. आणि मुख्य म्हणजे यासाठी जुन्या भरजरी साड्यांचा खूप आकर्षक पद्धतीने वापर केला जातो. यंदा दिवाळीत तुमच्या घरालाही तसाच आकर्षक फेस्टीव्ह लूक देण्याचा प्रयत्न करा.. त्यासाठी नेमकं काय करावं, याविषयी या काही टिप्स...
3 / 8
जुन्या साड्या वापरून तुम्ही असे पिलो कव्हर शिवू शकता.
4 / 8
सोफा आणि उशा यांना काॅन्ट्रास्ट किंवा एकमेकांशी मॅच होणाऱ्या रंगांच्या साड्या घेऊन अशा पद्धतीचे कव्हर शिवू शकता. घरात खूप छान फेस्टीव्ह वाईब्स येतील.
5 / 8
तुमचे नेहमीचे पडदे बदला आणि घराला अशा पद्धतीचे जुन्या साडीचे पडदे लावा..
6 / 8
दिवाळीत भाऊबीज, पाडवा यादिवशी आपण औक्षण करतो. औक्षणाच्या वेळी टाकण्यासाठी अशा पद्धतीचं जुन्या साडीचं आसन तुम्ही करू शकता.
7 / 8
दिवाळीच्या दिवसांमध्ये डायनिंग टेबलवर अशा पद्धतीचा टेबल क्लॉथ टाका. डायनिंग हाॅलला सुद्धा खूप छान लूक येईल..
8 / 8
जुन्या साड्यांपासून तयार केलेल्या अशा फ्रेम तुम्ही हाॅलमध्ये लावू शकता. यामुळेही हॉलचा लूक एकदम बदलून जाईल.
टॅग्स :Diwaliदिवाळी 2024Styling Tipsस्टायलिंग टिप्सHomeसुंदर गृहनियोजन