How to store vegetables without refrigeration? know this tricks
फ्रिज बिघडला, आता भाज्या ताज्या कशा ठेवणार? ६ टिप्स, फ्रिजमध्ये न ठेवताही भाज्या राहतील फ्रेश By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2023 12:57 PM1 / 7स्वयंपाकघरात महत्त्वाचा असतो तो फ्रिज. काय काय फ्रिजमध्ये ठेवले जाते. भाज्यांपासून कडधान्य, रव्यापर्यंत. खराब होण्याची शक्यता असलेले दूध-दही-ताक. पण फ्रिज बिघडला तर पंचाईत होते. भाज्या जास्त आणल्या तर त्या सडू नयेत म्हणून टेंशन. बाहेर ठेवल्या तर ताज्या राहत नाहीत. कधीकधी तर इतक्या भाज्या आणल्या जातात की फ्रिजमध्ये भाज्या ठेवण्यासाठी जागा पुरत नाही. अशावेळी काय करावे?2 / 7हिरव्या भाज्या निवडून पसरवून ठेवा. टोपलीमध्ये भाज्या एकावर एक अशा पद्धतीने ठेवू नका. म्हणजे पालेभाज्या सडणार नाहीत.3 / 7काकडी, सिमला मिरची, वांगी, फरसबी यासारख्या भाज्या लवकर खराब होत नाही. त्या भाज्या ओल्या सुती कपड्यात गुंडाळून ठेवा. यामुळे टवटवीत राहतील.4 / 7गाजर हवाबंद डब्यात ठेवले, चिरुन ठेवले तरी चांगले राहतात.5 / 7कडीपत्ता काळा पडतो. कडीपत्ता तेलावर परतवून हवाबंद डब्यात ठेवा.6 / 7चिंचेला मीठ लावून मोकळी ठेवा.7 / 7गॅसजवळ किंवा जिथं थेट ऊन येतं तिथं भाज्या ठेवू नका. सावलीत ठेवा. आणखी वाचा Subscribe to Notifications