शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

केसांत गजरा माळण्याच्या १० नव्या सुंदर स्टाइल्स, ५ मिनिटांत साधीशी हेअरस्टाइल दिसेल खास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2025 09:59 IST

1 / 13
सध्या लग्नसराईचा सिझन सुरु आहे. लग्नसराई किंवा ( simple hairstyle with gajra for women) कोणता खास कार्यक्रम असला की स्त्रिया साडी, गजरा असं सगळं साग्रसंगीत साजशृंगार करुन तयार होतात. सुंदर ठेवणीतली साडी नेसली की केसांची हेअर स्टाईल करुन गजरा माळला जातो.
2 / 13
केसांत गजरा माळला की आपला लूक अधिकच (How to style gajra on hairstyle simple) खुलून येतो. परंतु केसांत गजरा माळण्याची तीच ती जुनी पद्धत विसरुन आपण वेगवेगळ्या स्टाईलने केसांत गजरा माळून, आपला लूक अधिकच सुंदर आणि आकर्षक करु शकतो.
3 / 13
पूर्वी साडी नेसल्यावर केसांचा आंबाडा बांधून त्यावर गजरा माळण्याची पद्धत होती. परंतु आता ही फॅशन मागे पडली. आता केसांत वेगवेगळ्या पद्धतीने गजरा माळण्याचा ट्रेंड पुन्हा आला आहे.
4 / 13
मानेच्या बाजूने खाली झुकणारा आंबाडा घालून त्याभोवती आपण गजरा गुंडाळून घालू शकतो. याला 'लो बन गजरा' असे म्हणतात.
5 / 13
केसांच्या आंबाड्यात तुम्ही अशाप्रकारे अर्धचंद्र आकारात गजरा माळून तुमची हेअरस्टाईल अधिकच आकर्षक करु शकता. बनच्या खालच्या बाजूने अर्धचंद्र आकारात गजरा माळल्याने याला मून स्टाईल गजरा असे म्हटले जाते.
6 / 13
जर तुम्ही केसांची अशी वेणी घालणार असाल तर तुम्ही वेणीभोवती अशा प्रकारे गजरा गुंडाळून तुमची हेअरस्टाईल सुशोभित करू शकता.
7 / 13
जर तुम्हांला केसांत जास्त गाजरे न माळता, एकदम साधा हलका लूक हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारे केसांत गजरा माळू शकता.
8 / 13
केसांचा आंबाडा घातल्यावर तुम्ही मोगऱ्याच्या कळ्यांची अशा पद्धतीची जाळी तयार करून देखील केसांत माळू शकता. यामुळे तुमच्या अंबाड्याला अधिक शोभा येईल.
9 / 13
केसांची वेणी घालणार असाल तर वेणीत अशा प्रकारे थोडे थोडे अंतर सोडून देखील तुम्ही केसांत गजरा माळू शकता.
10 / 13
हेअरस्टाईलला जर हेव्ही लूक द्यायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे केसांत भरपूर गजरे माळून तुमच्या हेअरस्टाईलला अधिक हेव्ही करु शकता.
11 / 13
केसांत गजऱ्यांसोबतच तुम्ही फुलं देखील माळू शकता. अंबाड्याच्या बरोबर मध्यभागी फुलं माळून भोवती गजरा गुंडाळल्यास हेअरस्टाईल खूप सुंदर दिसते.
12 / 13
हेअरस्टाईल म्ह्णून केसांची वेणी घालणार असाल तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने गजरा माळल्यास तुमचा लूक चारचौघीत अधिकच उठून दिसेल.
13 / 13
अशा वेगवेगळ्या पद्धतीने केसांत माळलेला गजरा देखील तुम्हांला अधिक सुंदर लूक देऊ शकतो.
टॅग्स :fashionफॅशनStyling Tipsस्टायलिंग टिप्स