शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महागामोलाची पैठणी कायम नवीकोरी दिसायची तर करा फक्त ६ गोष्टी, पैठणी कायम राहील नव्यासारखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2022 6:05 PM

1 / 9
१. पैठणीसारखं महावस्त्र आपल्याकडेही असावं, अशी बहुतांश जणींची इच्छा असते. काही जणी तर पैठणीच्या बाबतीत एवढ्या हौशी असतात आणि पैठणी त्यांना एवढी प्रिय असते की त्यांच्याकडे एकापेक्षा जास्त पैठणी असतात.
2 / 9
२. हल्ली तर अस्सल पैठणीच्या किमतीतही खूप जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे एवढी महागडी आणि हौशीने घेतलेली पैठणी सांभाळायची कशी, तिची काळजी कशी घ्यायची, असा प्रश्नही अनेकींना पडतो.
3 / 9
३. सध्या तर लग्नकार्याचा हंगाम असल्याने अनेक जणींच्या पैठणी कपाटातून बाहेर येत आहेत. म्हणूनच पैठणी नेसताना आणि नेसून झाल्यावर पुन्हा ती कपाटात ठेवताना तिची कशी काळजी घ्यावी, याविषयी या काही खास टिप्स. अशा पद्धतीने जर काळजी घेतली तर पैठणीची चमक कधीच कमी होणार नाही.
4 / 9
४. पैठणी जेव्हा तुम्ही कपाटात ठेवता तेव्हा ती कधीच थेट प्लास्टिकच्या साडी बॅगमध्ये ठेवू नका. सगळ्यात आधी एखाद्या सुती कपड्याने ती व्यवस्थित गुंडाळा आणि त्यानंतरच बॅगमध्ये ठेवा.
5 / 9
५. पैठणी नेसल्यानंतर तिच्यावर कधीही परफ्यूम मारू नका. अशावेळी सहसा परफ्यूमऐवजी अत्तराचा वापर करा. जेणेकडून त्याचे थेंब पैठणीवर अजिबात उडणार नाहीत.
6 / 9
६. पैठणीवर अन्नपदार्थ सांडलेच तर लगेच ते पाणी लावून अजिबातच पुसू नका. कोरड्या कपड्याने ते अलगद टिपून घ्या आणि पैठणी लगेचच ड्रायक्लिनला टाका.
7 / 9
७. पैठणी कपाटात ठेवताना त्यात डांबर गोळ्या टाकू नका. किंवा पैठणीच्या आजुबाजुलाही डांबर गोळ्या ठेवू नका
8 / 9
८. पैठणी नेसून जेव्हा ती काढाल, तेव्हा ती खोलीतच पसरून ठेवा. थोड्या वेळ मोकळ्या हवेत राहू द्या. त्यानंतर घडी घाला.
9 / 9
९. पैठणीची घडी नेहमी बदलत रहा. अन्यथा ती घडीवर चिरू शकते.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सsaree drapingसाडी नेसणेSocial Viralसोशल व्हायरल