शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पावसाळ्यात लाकडी फर्निचर, दरवाजे- खिडक्या फुगणार नाहीत, ३ उपाय करा- कुबट वासही जाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2024 12:07 PM

1 / 6
पावसाळ्याच्या दिवसांत लाकडी फर्निचरची थोडी विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळी दमट हवेमुळे बऱ्याचदा लाकडी फर्निचर फुगतं..(how to take care of wooden furniture in rainy season)
2 / 6
घरातले दरवाजे आणि विशेषत: घराचा मुख्य दरवाजा, टेरेस- बाल्कनीतला दरवाजा या दिवसांत फुगतो. त्यामुळे मग तो एरवी होतो तसा सहजासहजी उघडता किंवा लावता येत नाही. त्याच्या लाकडी चौकटीत अडकून बसतो.(best remedies to avoid musty smell from wooden furniture in monsoon)
3 / 6
शिवाय या दिवसांमध्ये बऱ्याच लाकडी फर्निचरचा कुबट वासदेखील येतो. असं काही तुमच्या फर्निचरच्या बाबतीत होत असेल तर हे काही घरगुती उपाय लगेचच करून बघा. त्यामुळे वरील त्रास तर होणार नाहीतच पण फर्निचरदेखील अधिक काळ टिकण्यास मदत होईल.
4 / 6
सगळ्यात पहिला उपाय म्हणजे घरातलं सगळं फर्निचर आणि विशेषत: फुगलेल्या खिडक्या आणि दरवाजे ऑलिव्ह ऑईल लावून पुसून घ्या.
5 / 6
पावसाळ्यात कधीही ओल्या फडक्याने लाकडी फर्निचर पुसू नका. त्याऐवजी ते कोरड्या कपड्याने पुसा आणि त्यावर चमक पाहिजेच असेल तर खोबरेल तेलामध्ये थोडं इसेंशियल ऑईल टाकून त्याने पुसून घ्या.
6 / 6
लाकडी फर्निचरला एकदा पॉलिशिंग करून घ्या. यामुळेही दरवाजे- खिडक्या आणि इतर फर्निचर फुगणार नाहीत.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलCleaning tipsस्वच्छता टिप्सMonsoon Specialमानसून स्पेशलHome remedyहोम रेमेडी