How to Teach Kids To Study Parenting Tips : Effective Ways To Improve Study Habits For Your Kids
अभ्यासाला बसवलं की मुलं नाटकं करतात? ५ गोष्टी करा; मुलांना रागवावे लागणार नाही, अभ्यास करतील सहज By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 1:13 PM1 / 7लहान मुलं अभ्यासाला बसल्यानंतर नाटकं करतात, अभ्यास करायला बसतात तेव्हा झोप येतेय. भूक लागली, कंटाळा आलाय अशी कारणं देतात. त्याचं लक्ष अभ्यासाकडे कमी इतर गोष्टींकडे जास्त असतं. (Effective Ways To Improve Study Habits For Your Kids)2 / 7 मुलं जेव्हा वाचन-लिखाण करण्यात टाळाटाळ करतात तेव्हा सगळ्यात जास्त टेंशन आई-वडिलांना येते. काही सोप्या टिप्स फॉलो केल्या तर अभ्यासात मन लागेल आणि मुलांच्या मागे जास्त फिरावं लागणार नाही. 3 / 7मुलांसाठी अभ्यासाचं टायमिंग सेट करा, त्यांच्यासाठी १ स्टडी कॉर्नर बनवा. ज्या ठिकाणी बसून मुलं अभ्यास करू शकतील. त्यांच्यासाठी अभ्यासाचा टायमिंग सेट करा. यावेळेत त्यांना फोन किंवा टिव्हीपासून दूर राहायला सांगा.4 / 7मुलांना अभ्यासाचा ताण येणार नाही इंटरेस्टींग वाटेल यासाठी प्रयत्न करा. अभ्यास करताना मुलं बोअर होत असतील तर नवनवीन पद्धतीनं त्यांना शिकवा त्यांना अभ्यासाव्यतिरिक्त कार्टून्स, व्हिडीयोच्या मदतीने शिकवा. 5 / 7सायंस, पर्यावरणाशी निगडीत विषयांची माहीती द्या, जंगल, सायंस सेंटर किंवा सायंस एक्जिबिशनमध्येही तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता.6 / 7मुलांना कधीच अभ्यासाला एकटं बसवू नका. मुलांसोबत बसा आणि त्यांना व्यवस्थित समजावून सांगा. मुलांना उदाहरणं द्या जेणेकरून अभ्यास जास्त इंटरेस्टींग बनेल.7 / 7मुलांच्या क्लासमधील मुलांशी किंवा शेजारच्या मुलांशी कधीच त्यांची तुलतना करू नका. जर तुमचं मूल अभ्यासात हूशार नसेल तर वारंवार तुलना केल्याने त्याच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यापेक्षा त्यांच्यातील कमतरता समजावून सांगा आणि त्यांच्याशी प्रेमाने बोला. आणखी वाचा Subscribe to Notifications