शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' पद्धतीने डोक्याला लावा एरंडेल तेल! टक्कल पडलेल्या भागातही उगवतील केस-होतील घनदाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2024 4:08 PM

1 / 7
हल्ली केस गळण्याची समस्या खूपच जास्त वाढली आहे. पुर्वी फक्त पुरुषांच्याच डोक्याला टक्कल दिसायचं. पण आता मात्र काही महिलांच्याही माथ्यावरचे, कपाळाच्या दोन्ही बाजुकडचे केस विरळ होऊन तिथे टक्कल पडेल की काय अशी भीती वाटायला लागते.
2 / 7
तुमचेही केस असेच पातळ, विरळ झाले असतील तर कॅस्टर ऑईल म्हणजेच एरंडेल तेल कशा पद्धतीने वापरावं ते पाहा..(how to use castor oil for fast hair growth?)
3 / 7
ज्या भागात तुमचे केस खूप पातळ झाले आहेत त्या भागात एरंडेल तेल थोडं गरम करून लावा. तेल लावल्यानंतर हलक्या हाताने ५ ते ७ मिनिटे मालिश करा. यामुळे त्या भागातला रक्तप्रवाह चांगला होऊन केसांची मुळं पक्की होण्यास मदत होईल.(best remedies to control hair loss using castor oil)
4 / 7
कॅस्टर ऑईल थोड्याशा खोबरेल तेलात टाकून डोक्याला मालिश केल्यास ते त्वचेमध्ये चांगले मुरते.(benefits of castor oil for hair growth)
5 / 7
आठवड्यातून एकदा कॅस्टर ऑईल आणि कोरफडीचा गर सम प्रमाणात घेऊन डोक्याला मालिश करा. केसांमध्ये चांगला बदल दिसून येईल.
6 / 7
केसांची वाढ अधिक जोमाने व्हावी यासाठी कांद्याचा रस आणि कॅस्टर ऑईल सम प्रमाणात घेऊन डोक्याला मसाज करा.
7 / 7
थ्या रात्रभर पाण्यात भिजवा. त्यानंतर दुसऱ्यादिवशी त्या मिक्सरमधून बारीक करून घ्या. मेथीदाण्यांची पेस्ट कॅस्टर ऑईलमध्ये मिसळून घ्या आणि हा लेप केसांच्या मुळाशी लावा. अर्ध्या तासाने नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. केस गळण्याचं प्रमाण बरंच कमी होईल.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHair Care Tipsकेसांची काळजीHome remedyहोम रेमेडी