how to use coconut oil for glowing skin, beauty tips using coconut oil
दिवाळीसाठी पार्लरमध्ये जायला वेळच नाही? थेंबभर खोबरेल तेल घेऊन ५ गोष्टी करा- सौंदर्य बहरेल... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2024 12:43 PM1 / 7दिवाळीसाठी घर आवरणे, प्रत्येकासाठी काही ना काही गिफ्टची खरेदी करणे, घर सजवणे, फराळाचे पदार्थ करणे अशी कित्येक कामं घरातल्या प्रत्येकीच्या मागे असतात. या सगळ्या धावपळीत मग स्वत:साठी वेळ काढणं अनेकींना शक्य होत नाही. त्यामुळे मग पार्लरमध्ये जाऊन फेशियल, क्लिनअप करणं राहूनच जातं.2 / 7तुमचंही कामाच्या धावपळीत असंच झालं असेल आणि पार्लरमध्ये जाण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नसेल तर हातावर फक्त काही थेंब खोबरेल तेल घेऊन या काही गोष्टी करा. त्वचेचं सौंदर्य खुलविण्यासाठी नक्कीच त्याचा खूप चांगला फायदा होईल.3 / 7डोळ्यांखालची काळी वर्तुळं वाढली असतील तर खोबरेल तेल आणि कॉफी पावडर एकत्र करा. या मिश्रणाने डोळ्यांभोवती मसाज करा. त्यानंतर काही वेळाने त्वचा धुवून टाका. डार्क सर्कल्स बऱ्याच प्रमाणात कमी होतील.4 / 7खोबरेल तेल आणि पिठीसाखर एकत्र करून ओठांवर चोळल्यास ओठांचा काळेपणा बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होते. 5 / 7खोबरेल तेल आणि कांद्याचा रस एकत्र करून त्याने केसांच्या मुळाशी मालिश केल्यास केसांची वाढ चांगली होते.6 / 7तळपायावरच्या भेगा वाढल्या असतील तर खोबरेल तेल आणि व्हॅसलिन एकत्र करून तळपायाला लावा. रात्रभर पाय तसेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पाय बऱ्याच प्रमाणात मऊ पडलेले असतील.7 / 7खोबरेल तेल आणि हळद एकत्र करून दिवसातून एकदा ब्रश करा. दातांचा पिवळेपणा बऱ्याच प्रमाणात कमी होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications