शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पोटाला आराम देणारा आणि जिभेचेही चोचले पुरवणारा उपवास कसा करावा? आहारतज्ज्ञ सांगतात ५ टिप्स..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2024 4:49 PM

1 / 7
एकादशी आणि दुप्पट खाशी हा अनुभव आपल्यापैकी बहुतांश लोक आषाढी एकादशीच्या निमित्ताने घेणार आहेत. उपवासाच्या दिवशी आपण वेगवेगळे पदार्थ खा- खा खातो. पण त्यामुळे मात्र दुसऱ्या दिवशी लगेच त्याचा त्रास व्हायला लागतो.
2 / 7
म्हणूनच तब्येतीला पोषक असा आदर्श पद्धतीने उपवास कसा करावा, याविषयी आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी दिलेली ही माहिती एकदा बघा.
3 / 7
मुळात उपवासाची आदर्श पद्धत हीच उपवास करणे हेच आहे. म्हणजेच दररोज आपण बरेच जड पदार्थ खात असतो. तर या दिवशी पोटाला आराम देणे ही योग्य पद्धत आहे.
4 / 7
त्यातही दुसरी गोष्ट म्हणजे उपवासाचे जास्तीतजास्त पदार्थ पचायला जड आणि हाय ग्लायसेमिक इंडेक्स असणारे असतात. त्यामुळे ज्या लोकांना डायबिटीज आहे त्यांची शुगर या दिवसांमध्ये वाढू शकते. त्यामुळे पोर्शन साईजचे म्हणजेच कोणता पदार्थ किती प्रमाणात खाता याचे भान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण उपवासाचे सगळेच पदार्थ चविष्ट असल्यामुळे जास्त प्रमाणात खाल्ले जातात आणि त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात.
5 / 7
योग्य पद्धतीने उपवास करायचा असेल तर कमीतकमी पदार्थ खाऊन आणि लिंबूपाणी, ताक असे द्रव पदार्थ जास्तीतजास्त घेण्यावर भर द्यावा.
6 / 7
आषाढी एकादशी पावसाळ्यात येत असल्यामुळे पचनशक्ती मंदावलेली असते. त्यामुळे पचायला हलका आहार घ्यावा. नाहीतर दुसऱ्या दिवशी ॲसिडिटी, मायग्रेनसारखे त्रास ठरलेले आहेत
7 / 7
तसेच उपवासाच्या दिवशी कॅल्शियम जास्त असलेला राजगिरा वेगवेगळ्या प्रकारात खावा. जसे की राजगिऱ्याचा उपमा, थालिपीठ ताकासोबत खावे. राजगिरा खूप हळू-हळू पचत असल्यामुळे राजगिरा खाल्ल्यानंतर लवकर भूक लागत नाही.
टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीfoodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planआहार योजनाdiabetesमधुमेह