If Your Child Is Weak In Studies Then Follow These Words Of Educator Vikas Divyakirti
मुलांना अभ्यासाची गोडीच लागलेली नाही? विकास दिव्यकिर्तींचा खास सल्ला- मुलं स्वत:हून करतील छान अभ्यास By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 3:24 PM1 / 8मुलांची अभ्यासात टाळाटाळ केली किंवा त्यांना अभ्यासाला बसणं कंटाळवाणं वाटू लागलं तर पालकांना फार टेंशन येतं. वर्गातील इतर मुलांच्या तुलनेत आपलं मूल मागे पडायला नको असं प्रत्येक पालकाला वाटतं. 2 / 8आपल्या मुलांनी चांगला अभ्यास करावा चांगलं शिकावं यासाठी पालक त्यांना सगळ्यात सोयी सुविधा पुरवतात. त्यांना कधीच कमी पडत नाहीत.3 / 8सर्व सुख सुविधा असतानाही मुलं नीट अभ्यास करत नाही आणि मागे पडतात. इतर विद्यार्थांच्या तुलनेत त्यांना नेहमीच कमी गुण मिळतात.4 / 8जर तुमचे मूल इतर विद्यार्थांपेक्षा मागे आहे असं तुम्हाला वाटत असेल तर प्रसिद्ध शिक्षक आणि आयएएस कोचिंग क्लासेसचे संस्थापक डॉ. विकास दिव्यकिर्ती यांनी मुलांशी कसं वागायचं याबाबत सांगितले आहे. 5 / 8डॉ. विकास सांगतात की तुमचे मूल अभ्यासात मागे असेल तर इतर मुलांमध्ये येऊन त्यांच्यावर दबाव पाडू नका.6 / 8जर कोणी आपल्या मुलाचे ९८ टक्के आनंदाने सांगत असेल तर तुम्ही आपल्या मुलाचे ५८ टक्केसुद्धा त्याच गर्वाने सांगा. 7 / 8मुलांवर दबाव टाकल्याने आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि त्यांच्यात काही करून दाखवण्याची क्षमता कमी होते. 8 / 8मुलांना कशासाठीही बळजबरी करून उपयोग नाही. ते वेळेसोबत बदलत जातील आणि स्वत:ला सिद्ध करतील आणि आयुष्यात काही ना काही करतील अरे विकास दिव्यकिर्ती पालकांना सांगतात. आणखी वाचा Subscribe to Notifications