शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गौरी- गणपतीत गोडधोड खाऊन ॲसिडीटी वाढली, पोट फुगलं? १ सोपा उपाय- लगेच मिळेल आराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2024 9:21 AM

1 / 5
सणासुदीच्या दिवसांत कितीही नाही म्हटलं तरी गोडधोड पदार्थ, तेलकट- तुपकट पदार्थ खाणं होतातच. शिवाय कामाची दगदग, धावपळ असल्याने व्यायामही पुरेसा होत नाही.
2 / 5
यामुळे मग आपोआपच गॅसेस, अपचन, ॲसिडिटी पोट फुगणे असा त्रास होतो. त्यामुळे मग खूपच अस्वस्थ होतं. म्हणूनच हा त्रास टाळण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा..
3 / 5
ॲसिडिटी, अपचन, पोट फुगणे, छातीत जळजळ होणे, मळमळ होणे, अंग दुखणे असा कोणताही त्रास होऊ लागला असेल तर त्यासाठी कुठला उपाय करावा याविषयीची माहिती theperfecthealthhydkoti या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये असं सांगितलं आहे की शरीरातील वायू जेव्हा वाढतो तेव्हा हे सगळे त्रास होतात.
4 / 5
शरीरात वाढलेला वायू कमी करण्याचा पहिला उपाय म्हणजे आपल्या हाताच्या मधल्या बोटाचे ते मधले पेर आहे, त्याच्या मधल्या पॉईंटवर गोलाकार पद्धतीने ३० ते ६० सेकंद मसाज करा.
5 / 5
यानंतर आपल्या छातीच्या ज्या बरगड्या आहेत, त्याच्या एकदम खालच्या भागात जिथे थोडी पोकळी असते त्याठिकाणी दोन्ही हातांची पहिली चार बोटं ठेवा आणि थोडंसं कंबरेत खाली वाकून हलकासा दाब द्या. यामुळे गॅसेस मोकळे होतात.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स