Jacqueline fernandez on depression loneliness low phase of her life how she dealt with it
‘मी फार एकटी पडले होते, कशी जगले कुणास ठाऊक!’ - जॅकलीन फर्नांडीसला डिप्रेशन आलं तेव्हा.. By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 6:20 PM1 / 9जॅकलीन फर्नांडिसला (Jacqueline fernandez ) फॉलो करणारे सर्व लोक या मताचे असतील की ती खूप आनंदी व्यक्ती आहे. तुम्ही तिला क्वचितच उदास मूडमध्ये पाहिलं असेल. उत्साही, नेहमी हसतमुख आणि बडबड करणारी ती आहे! अनेकांना माहित नाही की त्याच जॅकलीनला तिच्या भूतकाळात वाईट प्रसंगातून जावे लागले होते.2 / 9जॅकलीन नेहमीच मनापासून बोलते आणि जेव्हा मुलाखतीत असते ती खूप छान व्यक्त होते. एका मनोरंजन पोर्टलला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जॅकलिनने तिच्या आयुष्यातील अज्ञात टप्प्याबद्दल सांगितले. ज्या वेळी तिला मानसिक त्रासाचा सामना करावा लागला. 3 / 9जॅकलीनने शेअर केले की तिने फक्त तिच्या समस्यांबद्दल तिच्या थेरपिस्टशी चर्चा केली. ती म्हणाली, ''मला वाटते की अस्वस्थ करणारे दिवस नेहमी येत राहतात. याचं कारण असे की आपण अशा इंडस्ट्रीत आहोत जिथे दररोज अफवा पसरवल्या जातात.4 / 9सोशल मीडियाही तुम्ही वापरता त्यामुळे लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात, तुमच्याबद्दल काय म्हणतात, एवढी माहिती तुमच्याकडे असते. मी सार्वजनिक व्यासपीठावर आहे. त्यामुळे आम्हालाही त्या प्रसंगांचा सामना करावा लागतो.''5 / 9जॅकलिन एकटेपणाबद्दल म्हणाली की, 'त्याच वेळी, तुमच्या आजूबाजूला असणारे लोक या समस्या विसरून जातात. आजूबाजूला माणसं असणं हे चांगलं आणि महत्त्वाचं आहे. खूप दिवसांपासून माझ्या आजूबाजूला माणसं नाहीत असं जाणवलं. मी अक्षरशः एकटीनं जगले. मी स्वतःचं समस्यांना तोंड द्यायला शिकले आहे. पण आता आजूबाजूला लोक असतानाही मला शांतता जाणवते.”6 / 9जॅकलिनचा भाऊ रायन देखील एका एंटरटेनमेंट पोर्टलवरील चॅट शोमध्ये सहभागी होता आणि त्याने आपल्या बहिणीच्या स्थितीबद्दल सांगितले. तो म्हणाला, 'मला वाटत नाही की ती सध्या कोणाशीही डेट करत आहे. ती त्यापैकी चार जणांच्या प्रेमात आहे आणि त्या सर्वांना चार पाय आहेत.' त्याने जॅकलिनच्या मांजरीकडे इशारा केला ज्यांच्यावर ती खूप प्रेम करते!7 / 9जॅकलीन फर्नांडिसने शेअर केले की ती को-स्टार किंवा इंडस्ट्रीतील कोणालाही डेटिंग करण्याच्या विरोधात नाही पण तिच्या सह-कलाकारांच्या बाबतीत मर्यादा ओलांडल्यासारखे वाटत नाही. 8 / 9ती म्हणाली, 'हे खरोखरच घडतं की, कारण मी सर्व अभिनेत्यांसोबत काम करते. ते सगळेच व्यावसायिकरित्या काम करतात, मीही स्वतःच्या सीमा ओलांडत नाही.'' 9 / 9यापूर्वी दीपिका पदुकोण आणि अनुष्का शर्मासारख्या अभिनेत्री मानसिक आरोग्याबद्दल बोलल्या होत्या आणि आता जॅकलिन! आयुष्यातील अशा टप्प्याबद्दल सर्वांसमोर व्यक्त होणे खरोखरच सोपे नाही परंतु या अभिनेत्रींनी जे केले ते कौतुकास्पद आहे! आणखी वाचा Subscribe to Notifications