शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वाटलं होतं आता सोडावं क्रिकेट! निराशेवर मात करुन पाकिस्तानविरुद्ध मैदान गाजवणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जची ‘कमबॅक’ गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2023 3:27 PM

1 / 7
जेमिमा रॉड्रिग्ज. महिला टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध तिनं अशी काही तडाखेबाज खेळी केली की आयसीसीलाही मोह झाला विराट कोहलीसह तिचा व्हिडिओ पोस्ट करण्याचा. दोन्ही खेळी तशाच, टीमला अटीतटीच्या सामन्यात जिंकवून देणाऱ्या. जबरदस्त पेशंन्स आणि गुणवत्तेनं भरलेल्या. अभिमान वाटाव्या अशाच (Jemima Rodrigues Indian Women Cricket Player T 20 World Cup).
2 / 7
जेमिमा रॉड्रिग्ज. मुळची मुंबईकर, भांडूपची ही तरुणी. तिचे वडील कोच होते, वयाच्या चौथ्या वर्षी जेमिमाच्या हातात बॅट आली आणि क्रिकेट तिचं पॅशन बनत गेलं.
3 / 7
जेमिमाचे वडील इवान रॉड्रिग्ज. त्यांच्याकडेच तिनं क्रिकेटचे प्राथमिक शिक्षण घेतले. इवान ती शिकत असलेल्या शाळेतच ज्युनियर कोच होते आणि या शाळेत त्यांनी मुलींची क्रिकेट टीम तयार केली.
4 / 7
लहानपणापासून जेमिमा आपल्या दोन भावांसोबत बॉलिंग करतच मोठी झाली. हॉकी आणि क्रिकेट हे दोन्हीही आवडीचे खेळ तिला आवडत. मात्र तिनं करिअर म्हणून क्रिकेट निवडलं.
5 / 7
न्यूझिलंडविरुद्धच्या मालिकेत तिला ड्रॉप करण्यात आलं तेव्हा तिला वाटलं होतं की आता बास, क्रिकेटला रामराम म्हणावं. पण तो निर्णय तिनं बदलला, आपल्या खेळावर भरवसा ठेवला आणि पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात जेव्हा सारी पत पणाला लागली होती तेव्हा जेमिमाचा अनुभवच किमयागार ठरला.
6 / 7
आज वयाच्या २२ व्या वर्षी जेमिमा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून आपली ओळख मिळवते आहे. टी-20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मिताली राजनंतर सर्वांत वेगवान एक हजार धावा पूर्ण करणारी ती दुसरी भारतीय महिला खेळाडू आहे.
7 / 7
जेमिमा रॉड्रिग्ज हे नाव क्रिकेटविश्वात सातत्य, मेहनत आणि कमालीचा संयम म्हणून ओळखले जाते. तिच्या फटकेबाजीतही कमालीचा संयम आणि अचूक टायमिंग आहे.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीJemimah Rodriguesजेमिमा रॉड्रिग्जT20 Cricketटी-20 क्रिकेटT20 World Cupट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२