शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फक्त ‘८’ गोष्टी करा आणि हिवाळ्यात कमवा रोगप्रतिकारशक्ती, तब्येत राहील एकदम फिट आणि वाटेल फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2022 6:02 PM

1 / 9
हिवाळ्याचा हंगाम सुरु झाला आहे. या ऋतूत अनेकांच्या शरीरात विशिष्ट आजारांचा शिरकाव होतो. बदलत्या ऋतूनुसार माणसाच्या शरीरातील गरजा देखील बदलतात. प्रत्येक ऋतूनुसार लोकांनी विशिष्ट ऋतूतील भाज्या आणि फळांचे सेवन केले पाहिजे. या काळात ताप, सर्दी, खोकला यासारखे आजार उद्भवू लागतात. या ऋतूत काहींच्या शरीरातील रोगप्रतीकारकशक्ती देखील कमी होते. त्यामुळे आजारांशी दोन हात करण्यासाठी त्यांना पुरेशी उर्जा मिळत नाही. दरम्यान, शरीरातील रोगप्रतीकारक शक्ती वाढवण्यासाठी काय केले पाहिजे या संदर्भात आज जाणून घेणार आहोत.
2 / 9
हिवाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे आपण पाणी जास्त पीत नाही. या कारणामुळे शरीराला पुरेसं पाणी मिळत नाही, आणि यामुळे शरीरात विविध आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाण्याची कमतरतेमुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडते आणि रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते. अशा परिस्थितीत दररोज किमान 2-3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.
3 / 9
निरोगी राहण्यासाठी ज्या त्या ऋतूत मिळणाऱ्या फळांचे सेवन केले पाहिजे. कोणतेही नैसर्गिक पोषणयुक्त फळ शरीरावर चांगले कार्य करते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हंगामी फळांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शरीराला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि एंटीऑक्सीडेंटयुक्त फळांचे सेवन करावे. व्हिटॅमिन सीसाठी तुम्ही मोसंबी, लिंबू, किवी, पपई आणि पेरू यांसारखी लिंबूवर्गीय फळे खाऊ शकता.
4 / 9
हिवाळ्यात बदाम, खजूर आणि गुळाचा समावेश करणे आवश्यक आहे. याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आले, लवंग, तुळशीच्या पानांचा वापर केल्यास सर्दी आणि फ्लूपासून आराम मिळतो. या ऋतूमध्ये मधाचे सेवन आरोग्यासोबतच त्वचेसाठीही खूप महत्त्वाचे असते.
5 / 9
प्रत्येक ऋतूमध्ये लिंबाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. हिवाळ्यातही दररोज किमान २ ग्लास लिंबूपाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते. यासोबतच मौसमी फ्लूपासून संरक्षण मिळेल आणि शरीराला विटामिन सी मुबलक प्रमाणात मिळेल.
6 / 9
हिवाळ्यात लोकं शारीरिक हालचाली कमी करतात, ज्यामुळे चयापचय मंदावते आणि वजन वाढते. ही समस्या टाळायची असेल तर दररोज व्यायाम करा. यामुळे चयापचय सुरळीत राहील आणि रोगप्रतिकारशक्तीही सुधारेल.
7 / 9
भारतीय मसाले आरोग्यासाठी अनेक फायदे देतात. यापैकी केशर, हळद, दालचिनी आणि वेलची यांसारखे भारतीय मसाले हिवाळ्यात खूप उपयुक्त आहेत. कारण हे मसाले शरीराला आवश्यक उष्णता देतात. ते सर्दी, खोकला आणि फ्लू सारख्या सामान्य आजारांपासून बचाव करण्यास देखील मदत करतात.
8 / 9
हिरव्या पालेभाज्यांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. हिरव्या पालेभाज्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि लोह भरपूर प्रमाणात असते. हे घटक अनेक आरोग्य फायद्यासाठी चांगले आहेत. तसेच त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यामुळे हिवाळ्यातील हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करावा.
9 / 9
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शरीराला चांगली झोप देखील आवश्यक आहे. पुरेशी झोप घेतल्याने रोगप्रतिकारक यंत्रणेला विश्रांती आणि ताजेतवाने होण्यास वेळ मिळतो. त्यामुळे जेव्हा आपण झोपायला जाता तेव्हा मोबाईल, टॅब किंवा टीव्हीसारख्या इलेक्ट्रिक उपकरणांपासून दूर राहा. झोपण्यापूर्वी स्क्रीनपासून थोडावेळ लांब राहणे तितकेच गरजेचं आहे.
टॅग्स :Winter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीLifestyleलाइफस्टाइल