शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

करिना कपूरप्रमाणेच गरोदर असताना काम करणाऱ्या 6 बॉलिवूड अभिनेत्री; ग्लॅमर जगाच्या मोडल्या जुनाट परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 2:54 PM

1 / 9
१. प्रेग्नन्सी हा काही आजार नाही. त्यामुळे तब्येतीची योग्य काळजी घेऊन, आहाराकडे व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही प्रेग्नन्सीचे ९ महिनेही पुर्ण जोमात काम करू शकता, असा सल्ला हल्ली अनेक स्त्रीरोगतज्ज्ञ देतात.
2 / 9
२. अभिनेत्रीही या नियमाला अपवाद नाही, हे करिनासारख्या काही अभिनेत्रींकडे पाहून लक्षात येते. पुर्वी लग्न झालं की अभिनेत्रींच्या करिअरला उतरती कळा लागायची. पण आता मात्र प्रेग्नंट असताना आणि आई झाल्यानंतरही अनेक अभिनेत्री त्यांची बॉलीवूडमधली जागा टिकवून आहेत.
3 / 9
३. सध्या करिना कपूरची याबाबतची एक पोस्ट सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. लालसिंग चढ्ढा (Laal Singh Chaddha) हा अमीर खान सोबतचा तिचा आगामी चित्रपट. या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान ती प्रेग्नंट होती.. त्यामुळे तिचा छोटा मुलाग जेह हा देखील या चित्रपटाचा एक भाग आहे.. तिला आणि जेहला दोघांनाही चित्रपटांत काम करण्याची संधी दिली याबाबत तिने अमीर खानला आणि अद्वैतला थॅंक्स म्हटले आहे. एवढंच नाही तर it's something I will cherish forever... असंही तिने सांगितलं..
4 / 9
४. करिनाचं पहिल्या मुलाच्या म्हणजेच तैमूरच्या वेळीही तसंच झालं होतं. Veere Di Wedding या चित्रपटाचं शुटींग सुरू असताना ती प्रेग्नंट झाली. त्यानंतर काही सीन पटापर उरकावे लागले तर काही बदल कथानकात करावे लागले होते.
5 / 9
५. जुही चावलाचंही असंच झालं होतं.. तिचा दुसरा मुलगा अर्जून याच्यावेळी ती जेव्हा गरोदर होती, तेव्हा तिचं झंकार बिट्सचं चित्रीकरण सुरू होतं.
6 / 9
६. अभिनेत्री काजोलनेही We Are Family या चित्रपटाचं शुटींग ती गरोदर असताना पुर्ण केलं होतं.. एवढंच नाही तर शुटींग संपल्यानंतरही चित्रपटाच्या प्रमोशनल ॲक्टीव्हिटीजमध्ये तिचा पुर्णपणे सहभाग असायचा.. त्यानंतर तिने मुलाला जन्म दिला.
7 / 9
७. Heroine या चित्रपटाचं शुटींग सुरू झालं आणि ऐश्वर्या राय गरोदर राहिली. नुकतंच शुटींग सुरू झाल्याने तिला ते पुर्ण करणं शक्य होणार नव्हतं.. त्यामुळे ती चित्रपटातून बाहेर पडली आणि तिच्या जागी करिना कपूरला घेण्यात आलं.
8 / 9
८. श्रीदेवी जेव्हा जुदाई या चित्रपटाचं शुटिंग करत होती, तेव्हा ती जान्हवीच्या वेळी प्रेग्नंट होती.. चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर हाेते.. त्यामुळे तिच्या प्रेग्नन्सीची बातमी ऐकून तिचे शॉट पटापट पुर्ण करण्यात आले.
9 / 9
९. हीच स्टोरी आहे जया बच्चन यांची. शोले चित्रपटात काम करत असताना त्यांच्या पोटात मुलगी श्वेता होती.. काळजीपुर्वक पाहिल्यास चित्रपटात काही ठिकाणी त्यांचे बेबी बंम्पसही दिसतात..
टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसीCelebrityसेलिब्रिटीKareena Kapoorकरिना कपूरAishwarya Rai Bachchanऐश्वर्या राय बच्चन