kangana ranaut information, Actress to winning in Loksabha 2024 Election with big margin
मंडी ते मंडी! घरातून पळून जाण्यापासून खासदार होण्यापर्यंतचा कंगना रनोटचा प्रवास-सुपरस्टार खासदार By भाग्यश्री कांबळे | Published: June 04, 2024 6:58 PM1 / 9भाग्यश्री कांबळे : बॉलीवूडची 'धाकड' अर्थात कंगना रनोट (Kangana Ranaut) आपल्या परखड वक्तव्यासाठी ओळखली जाते. तिने हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली (Loksabha 2024). आणि पहिल्याच निवडणुकीत तिने विजयाचा गुलाल उधळला. मंडी मतदार संघात कंगनाच्या विरोधात काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह होते (BJP). पण तिने जोरदार प्रचार करीत विजय मिळवला. पण तिचा अभिनेत्री ते राजकारणातला प्रवास सोपा नव्हता. १५ व्या वर्षी घरातून पळून जाणे ते खासदार; कंगनाने आयुष्यात कशी मुसंडी मारली पाहूयात(kangana ranaut information, Actress to winning in Loksabha 2024 Election with big margin).2 / 9कंगनाचा जन्म २३ मार्च १९८७ रोजी हिमाचल प्रदेशच्या भांबला गावात राजपूत कुटुंबीयात झाला. तिने आपलं शालेय शिक्षण डीएव्ही स्कूल, चंदीगड येथून पूर्ण केले. कंगना १२ पास आहे. तिला अभ्यासापेक्षा मॉडेलिंगमध्ये जास्त रस होता. खरंतर, कंगनाच्या कुटुंबियांचा बॉलिवूड किंवा मनोरंजनाशी कोणताही संबंध नाही. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तिने घर सोडले होते. 3 / 9घर सोडल्यानंतर घरच्यांनी तिच्यासोबत कोणताही संपर्क ठेवला नव्हता. अशी ताकिद घरातल्यांना देण्यात आली होती. पण त्यावेळी आईने साथ दिली. कंगना घरच्यांचा विरोध पत्करून मुंबईत आली होती. तिच्याकडे सुरुवातीला राहायला घर नव्हतं. त्याकाळी फुटपाथवर झोपत असल्याचं ती सांगते. 4 / 9एका मुलाखतीत तिने 'मला इंग्रजी बोलता येत नव्हतं तेव्हा माझ्या बोलण्याची, लुक्सचे सगळेच खिल्ली उडवायचे' असंही तिनं सांगितलं. 5 / 9मॉडेलिंग केल्यानंतर थिएटर वर्कशॉपमध्ये तिने अॅक्टिंग शिकली. शिवाय अनेक नाटकांमध्येही काम केलं. प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रियेने तिला चित्रपटात करिअर करण्यासाठी मुंबईत स्थलांतरित होण्यास प्रवृत्त केलं.6 / 9२००६ साली रोमँटिक थ्रिलर गँगस्टर: अ लव्ह स्टोरीमधून सिनेसृष्टीत प्रवेश केला. या चित्रपटातील मुख्य भुमिकेमुळे ती रातोरात प्रकाशझोतात आली. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलं नाही. फिल्मी करिअरमध्ये तिच्या अनेक चढउतार आले. पण ती खचली नाही. तिने प्रत्येक भूमिकेतून स्वतःला सिद्ध केलं आहे. 7 / 9१८ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये कंगनाने अनेक चित्रपटात काम केलं आहे. ज्यात फॅशन, क्रिश 3, तनु वेड्स मनू आणि क्वीन सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. 8 / 9पुरस्काराबद्दल सांगायचं झाल्यास, तिने ४ वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला आहे. चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट योगदानासाठी कंगनाला पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय तिला ५ फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले आहेत.9 / 9कंगनाचा बहुप्रतिक्षित ‘इमर्जन्सी’ हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं तिनं दिग्दर्शनही केलं आहे. या चित्रपटाकडून तिला खूप अपेक्षा असल्याचं ती म्हणते. आणखी वाचा Subscribe to Notifications