शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बेडरुममध्ये ठेवा कोरफड, शांत झोप येण्यासह मिळेल भरपूर ऑक्सिजन, ४ फायदे-घरात वाटेल फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2024 1:23 PM

1 / 8
सौंदर्यासाठी कोरफड किती उत्तम आहे, हे तर आपण जाणतोच. त्यामुळेच तर वेगवेगळ्या सौंदर्योपचारांमध्ये कोरफडीच्या गराचा वापर हमखास केला जातो.
2 / 8
केसांसाठी नॅचरल कंडिशनर म्हणून कोरफड ओळखली जाते. कोरफडीमध्ये असणारे घटक केसांच्या वाढीसाठी तर पोषक ठरतातच, पण केसांना मऊ, सिल्की बनवतात.
3 / 8
आता कोरफड तुमच्या बेडरुमध्ये ठेवल्याने काय फायदे होतात ते पाहूया...
4 / 8
सगळ्यात पहिला फायदा म्हणजे कोरफडीतून उत्सर्जित होणाऱ्या काही घटकांमुळे शांत झोप येण्यास मदत होते. ज्यांना लवकर झोप येत नाही किंवा झोप लागली तरी सारखी झोपमोड होते, त्यांनी कोरफड बेडरुममध्ये अवश्य ठेवावी.
5 / 8
काही रोपं अशी असतात जी इतर रोपांच्या तुलनेत जास्त प्रमाणात ऑक्सिजन उत्सर्जित करतात. कोरफड त्यांच्यापैकीच एक आहे.
6 / 8
कोरफडीसारखे काही घटक हवेतील प्रदुषित वायू किंवा घटक शोषून घेण्यास मदत करतात. त्यामुळे खोलीतले वातावरण शुद्ध राहावे यासाठी कोरफड नक्कीच मदत करते.
7 / 8
वातावरणातील नकारात्मकता कमी करून सकारात्मक उर्जा प्रवाहित करण्यासाठीही कोरफड उपयुक्त ठरते, असं म्हणतात.
8 / 8
कोरफडीच्या रोपाला स्वच्छ सुर्यप्रकाश गरजेचा असतो. त्यामुळे हे रोप कायमस्वरुपी घरातच ठेवू नका. दिवसा घराच्या बाहेर आणि रात्री आत असं तुम्ही करू शकता.
टॅग्स :Gardening Tipsबागकाम टिप्सHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स