शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भडक, वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणारी केतकी चितळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 4:09 PM

1 / 8
अभिनेत्री केतळी चितळे (Ketaki Chitale) पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. खरं तर यापूर्वी एका राजकीय नेत्याबद्दल पोस्ट केलेल्या एका कवितेमुळे तिला तुरूंगातही जावे लागले होते. आता नुकत्याच गुढीपाडव्याला तिने पुण्यातील एका बॅनरवर भाष्य केले. त्यानंतर ती मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली. खरंतर केतकी एक टीव्ही अभिनेत्री आहे.
2 / 8
आंबट गोड आणि तुझं माझं ब्रेकअप या मालिकेतल्या तिच्या भूमिका गाजल्या होत्या. त्यानंतर ती सिरीअलमध्ये फारशी दिसली नाही. एपिलेप्सी या आजारामुळे आणि त्यासंदर्भात तिनेच केलेल्या काही व्हिडिओंमुळे ती चर्चेत होतीच. या आजारामुळेच आपल्याला मालिकेतून काढून टाकण्यात आलं असं तिचं म्हणणं होतं.
3 / 8
तं. ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्वत:ला एपिलेप्सी क्विन म्हणवते. लॉकडाऊनमध्ये तिने केलेले अनेक व्हिडिओ गाजले, त्यावर फार टीका झाली. एकूण वाद आणि त्याभोवतीची चर्चा हे केतकीसंदर्भात नेहमी घडते.
4 / 8
केतकीनं लॉकडाऊन काळात अनेक वादग्रस्त पोस्ट केल्या होत्या. केतकीच्या या पोस्टनंतर राजकीय क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. काही काळ तुरुंगवास, ॲट्रॉसिटीचा गुन्हाही तिच्यावर दाखल करण्यात आला. आता गुढी पाडव्याला तिने एक पोस्ट केली आणि त्यानंतर पुन्हा वाद पेटला.
5 / 8
गुढीपाडव्याला पोस्ट केलेल्या एका व्हिडिओत ती म्हणते, नमस्कार मी केतळी चितळे मी सध्या पुण्यात म्हणजेच स्वयंघोषित मावळ्यांच्या जन्मभूमीत आहे. रस्त्यावर चालताना मला अनेक ठिकाणी ‘हॅप्पी गुढी पाडवा’ असे पोस्टर दिसले. त्यामुळे मला या सगळ्या मावळ्यांना विचारायचं आहे की, आता तुम्ही विसरलात का महाराजांना, त्यांच्या शिकवणीला?
6 / 8
की फक्त दादागिरी करताना महाराजांचे नाव वापरुन त्यांचा अपमान करता. आजही नवीन वर्षांच्या हॅप्पी गुढी पाडवा अशा शुभेच्छा देताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही, असो.. गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..’. केतकीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
7 / 8
मात्र त्यानंतर त्या पोस्टवर अनेकजण चिडले. कुणी तिची बाजू घेऊन तिच्या बाजूने वाद घालू लागले तर कुणी तिच्यावर प्रचंड टीका केली.
8 / 8
तिच्यावर जातीय टिप्पणी करत असल्याचे आरोपही अनेकांनी केले. केतकी चितळे हे नाव पुन्हा एकदा वादात सापडले.
टॅग्स :Ketaki Chitaleकेतकी चितळेMarathi Actorमराठी अभिनेताPuneपुणे